साई संस्थानच्या व्हीआयपी प्रवेशद्वारावरील गालीचे ठरताय आकर्षणाचा केंद्रबिंदू

साई संस्थानच्या व्हीआयपी प्रवेशद्वारावरील गालीचे ठरताय आकर्षणाचा केंद्रबिंदू

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी (Shirdi) शहरातील मनोज कुमार पथ मार्गावरील साईसंस्थानच्या व्हीआयपी प्रवेशद्वारावरील (VIP Entrance of Sai Sansthan) कृत्रिम हिरवेगार गालीचे आकर्षणाचा केंद्रबिंदू (Center of Attraction) ठरत असून अशाचप्रकारे साईमंदीर (Sai Temple) परिसरात तसेच मंदीराच्या बाहेर सजावट करण्यासाठी साईसंस्थान (Sai Baba Trust) प्रयत्नशील असल्याचे साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (CEO Bhagyashree Banayat) यांनी सांगितले.

साईमंदीर (Sai Temple) परिसरात भाविकांना दर्शनासाठी जात असताना आकर्षण वाटावे यासाठी विविध प्रकारच्या योजना अंमलात आणण्यासाठी साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (CEO Bhagyashree Banayat) प्रयत्नशील आहेत. जुन्या पिंपळवाडी रोडलगत असलेल्या मनोजकुमार पथमार्गावरील व्हीआयपी प्रवेशद्वारावर (VIP Entrance) तसेच दोन्ही बाजूला फुलांच्या कुंड्या व कुत्रीम प्लास्टिकचे हिरवेगार गालीचा लावून सजावट करण्यात आली आहे. दर्शन रांगेच्या बाहेरील बाजूला लावण्यात आलेला हिरवा गालीचा हजारो भाविकांच्या मनाला मोहीत करत साईभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. या ठिकाणावरून जाणारे येणारे साईभक्तांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नसून अशाचप्रकारे हिरवागार गालीचा व रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या इतर ठिकाणावर लावण्यात यावा अशी मागणी साईभक्तांकडून होत आहे.

देशविदेशातील लाखो दानशूर साईभक्त देणगी देण्यास उत्सुक असतात त्यामुळे मंदिर परीसरात सुशोभीकरण केल्यास पर्यटनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले. यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. मंदिरात तसेच मंदीर परिसरात विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट आणि आकर्षक पाण्याचे फवारे, रंगीत विद्युत रोषणाई करावीत, अशीही मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com