साई संस्थानच्या रुग्णालयातील वैद्यकीय पदे भरुन प्रलंबित प्रश्न मार्गी लावा

साई संस्थानच्या रुग्णालयातील वैद्यकीय पदे भरुन प्रलंबित प्रश्न मार्गी लावा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून सातासमुद्रापार ख्याती प्राप्त झालेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्यावतीने श्रीसाईबाबांच्या हयातीपासून आजतागायत सुरू असलेल्या रुग्णसेवेचा वारसा जपण्यासाठी साईसंस्थानच्या दोन्ही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आर.एम.ओ. डॉक्टर, परिचारिका, ब्रदर्स आदी रिक्त पदे तसेच रुग्णालयातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी साईसंस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी दिली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात साईबाबांच्या हयातीपासून सुरू असलेल्या रुग्णसेवेचा वारसा संस्थानच्या दोन्ही रुग्णालयात जपला जात आहे. परंतु साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणी साईनाथ रुग्णालय या दोन्ही रुग्णालयात रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी, आर.एम.ओ. डाँक्टर, परिचारिका, ब्रदर्स, टेक्निशियन आदी पदे भरण्यात यावेत यासाठी साईसंस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांना भेटून संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या दोन्ही रुग्णालयात राज्यातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. साईसंस्थानकडे दोन्ही रुग्णालयात मोठी अद्ययावत यंत्रणा व साधनसामग्री आहे.परंतु यासाठी अनुभवी तज्ञ डॉक्टर,परिचारिका, ब्रदर्स यांचा तुटवडा आहे. साईबाबांच्या शिकवणी नुसार रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी आपली सेवा समर्पित करावी. रुग्णालयात उपचारासाठी आलेला रुग्णांना तसेच नातेवाईकांना वेळेवर माहीती प्राप्त करून दिली जात नाही त्यासाठी चौकशी काऊंटरवर बहूभाषीक कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी.

तसेच रुग्णालयात आँनड्युटी असलेल्या सुरक्षा रक्षकांना धुम्रपान करण्यास बंदी करावी. रुग्णालयातील स्वच्छता गृह नेहमी स्वच्छ करण्यात यावी अशी मागणी श्री सोनवणे यांनी केली असून सदरचे रुग्णालयातील प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आपण साईसंस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com