साई संस्थानला 35 लाखाचे 1 लाख सॅनिटायझर पाऊच दान

साई
साई

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईंच्या प्रती श्रद्धा ठेवून करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी एका केमीस्ट आणि ड्रगीस्ट कंपनीच्या मालकाने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापनास

अंदाजे 35 लाख रुपयांचे सुमारे 1 लाख सॅनिटायझरचे सुगंधी पाऊच दान दिले. सदरचे पाऊच दर्शन रांगेतून येणार्‍या प्रत्येक भाविकांना उदीबरोबर मोफत वाटप करण्यात येत आहे. दरम्यान सुगंधी आणि किंमती सनिटायझरचे पाऊच मिळाल्याने साईभक्तांनी संस्थान प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

साईबाबा संस्थानच्या वतीने मागील दोन दिवसांपासून दर्शन रांगेतून येणार्‍या भाविकांना मोफत सॅनिटायझरचे पाऊच देण्यात येत आहे. सदरील नावाजलेल्या कंपनीचे किंमती सॅनिटायझरचे कोणी दिले याबाबत शहरात चर्चेला उधाण आले होते.

मात्र याबाबत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांनी खुलासा करताना सांगितले की, एका सुप्रसिद्ध कंपनीच्या व्यवस्थापनाने साईबाबा संस्थानला सुमारे एक लाख सॅनिटायझरचे पाऊच दान दिले आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे.

बाबांच्या हयातीपासून उदी देण्याची परंपरा आजही मंदिर परिसरात सुरू आहे. उदीवर करोडो भाविकांची श्रद्धा आहे. या उदीबरोबरच भक्ताने दान दिलेल्या सॅनिटायझरचे पाऊच वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com