साई संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवा - आ. काळे

साई संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवा - आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना बाधित गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी साई संस्थानच्या कोविड

सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांच्याकडे केली आहे.

आमदार आशुतोष काळे यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांची नुकतीच भेट घेवून साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवण्याबाबत चर्चा केली. कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आजपर्यंत वीस रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे या कोविड केअर सेंटरवर अतिरिक्त ताण पडला आहे. त्यामुळे करोनाबाधित गंभीर पेशंटसाठी साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये कोपरगावच्या रुग्णांना बेड आरक्षित ठेवल्यास रुग्णांवर वेळेत उपचार होवून त्यांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

त्यासाठी बेड आरक्षित ठेवावे व करोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी आय. सी. एम. आर. कडे परवानगीसाठी प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखा अधिकारी बाबासाहेब घोरपडे, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com