साई संस्थानने चॅनल सुरू करावे

शिवसेनेचे कमलाकर कोते यांचे आवाहन
साई संस्थानने चॅनल सुरू करावे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानने श्री साईबाबांच्या श्रद्धा व सबुरी आणि इतर शिकवणीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी स्वतंत्र दूरदर्शन चॅनलची निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात यावा,

या आशयाची मागणी शिवसेनेचे शिर्डी विधानसभा मतदार संघाचे संघटक कमलाकर कोते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, श्री साईबाबांंमुळे शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान झाले असून देश-विदेशात ते प्रसिद्ध असे तिर्थस्थान समजले जात आहे. श्री साईबाबा हे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असून सबका मालिक एक व श्रद्धा सबुरीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी तिरुपतीप्रमाणे साई संस्थानने स्वतंत्र दूरदर्शन चॅनल शिर्डीतून सुरू करावे.

त्यामुळे साई संस्थानचे सर्व कार्यक्रम व श्री साई मंदिरातील सर्व आरत्या, विविध धार्मिक कार्यक्रम या चॅनलवर प्रसारित होऊन सर्व भारत व विदेशातही साईभक्तांना घरबसल्या ते पाहता येईल. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून साईबाबांचे देश-विदेशात करोडो साईभक्त आहेत. या साईभक्तांना ऑनलाईन दर्शन सुरू आहे.

मात्र तिरुपतीप्रमाणे शिर्डीतही साई संस्थानने दूरदर्शन चॅनल सुरू करून श्रीसाई समाधी मंदिरात व परिसरात सुरू असलेले धार्मिक कार्यक्रम, मंदिरातील सर्व आरत्या व उत्सवाच्या काळातील सर्व धार्मिक कार्यक्रम या चॅनेलवर प्रत्यक्ष लाईव्ह प्रक्षेपण करून देश-विदेशातील साईभक्तांना ते घरबसल्या पाहता येतील. तरी साई संस्थानने या मागणीचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com