साई संस्थानची अनुकंपास पात्र असलेल्या 21 जणांची नेमणूक

साई संस्थानची अनुकंपास पात्र असलेल्या 21 जणांची नेमणूक

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने शासन निर्णयास अधिन राहून 2009 ते ऑगस्ट, 2020 अखेरपर्यंत अनुकंपा प्रतिक्षा यादीवरील 26 पात्र उमेदवारांपैकी आज 15 सप्टेंबर 2022 रोजी 21 पात्र उमेदवारांना संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते नेमणूक आदेश देण्यात आले.

शासनाच्या 27 ऑगस्ट 2020 आदेशान्वये श्री साईबाबा संस्थानाच्या अनुकंपा तत्वावर नियुक्ती बाबत मान्यता दिलेली होती. त्या मान्यतेस अधिन राहून 2009 ते ऑगस्ट 2020 या कालावधीत स्थायी पदावरील मयत झालेल्या कर्मचार्‍यांचे प्रतिक्षा यादीतील पात्र होत असलेल्या अनुकंपा वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार गट क व गट ड चे रिक्त पदावर एकत्रित मानधनावर नेमणुका देण्याबाबतचा संस्थान व्यवस्थापन समितीचे 24 फेब्रुवारी 2022 रोजीचे सभेतील निर्णयानुसार एकुण 26 पात्र अनुकंपा वारसांपैकी गट क पदांची 8 व गट ड पदांची 13 अशी एकूण 21 अनुकंपा उमेदवारांना संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते नेमणूक आदेश देण्यात आले. यावेळी श्रीमती बानायत यांनी सर्वांना शुभेच्छा देत, आपण सर्व काम करताना बाबांची सेवा समजून काम कराल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com