पदाधिकार्‍यांनो, अधिकृत पत्र दिले तरच साईंचे व्हिआयपी दर्शन मिळणार

प्रभारी सीईओ जाधव यांचे आदेश
पदाधिकार्‍यांनो, अधिकृत पत्र दिले तरच साईंचे व्हिआयपी दर्शन मिळणार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साई संस्थानच्या कार्यालयासह मंदिर परिसरात यापुढे आजी माजी मंत्री, आमदार, खासदार आणि विश्वस्तांच्या अधिकृत स्विय सहाय्यकाकडून संस्थानला पत्र द्यावे लागेल तरच व्हीआयपी दर्शनासाठी सेवा मिळणार आहे. शिर्डी संस्थानच्या काही बाबी लक्षात आल्यानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे साईभक्तांची लूट थांबणार आहे.

साई बाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली दर्शन घडवून आणणारी टोळीच शिर्डी संस्थानच्या आवारात कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींचे पीए असल्याचे किंवा एजंट म्हणून वावरणार्‍यांना साई संस्थानकडून दणका देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे भाविकांची व्हिआयपी दर्शनाच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबणार असून प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचा गैरवापर थांबणार आहे. व्हिआयपी दर्शन घडवणार्‍या संस्थान कर्मचार्‍यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. शिर्डी संस्थानकडून दर्शनसाठी व्हीआयपी सेवा आहे, त्याच्या नावावर आर्थिक लूट करणारी टोळीच संस्थानच्या आवारात फिरत असल्याच्या तक्रारी आणि काही बाबी निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com