साई संस्थान विश्वस्तपदाचा तिढा सुटता सुटेना सरकारकडून तारीख पे तारीख

दोन आठवड्याची मुदतवाढ पुढील सुनावणी 23 जुलै रोजी
साई संस्थान विश्वस्तपदाचा तिढा सुटता सुटेना सरकारकडून तारीख पे तारीख

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (In the Aurangabad Bench of the Mumbai High Court) साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी (Appointment of Sai Baba Board of Trustees) सरकार पक्षाकडून आतापर्यंत तीन ते चार वेळेस मुदत वाढवून घेतली असून काल बुधवारी पुन्हा तारीख पे तारीख प्रत्यय आला असून अजून दोन आठवड्याची मुदतवाढ मागितली.(Asked for a two-week extension.) यावर न्यायालयाने शासनाची मागणी मान्य करत मुदतवाढ दिली आहे.

दोन आठवड्यानंतर अधिकृत विश्वस्त मंडळाची यादी सादर करणार की आणखी तिढा वाढणार याची उत्सुकता पुढील 23 जुलै रोजी होणार आहे. एकप्रकारे वाढीव मुदतीचा फायदा ग्रामस्थांना झाला असून विश्वस्त मंडळात स्थानिकांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावे यासाठी स्थानिक ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार (Local villagers will meet the Chief Minister) असल्याचे समजते.

साईबाबा विश्वस्त मंडळाची अधीकृत घोषणा काल सुनावणीची तारीख असलेल्या उच्च न्यायालयात (High Court) होणार असल्याचे मागील तारखेला शासनाच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. मात्र देशासह जगभरातील करोडो साईभक्तांचे न्यायालयाकडे लक्ष वेधून असलेल्यांंच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. एकप्रकारे शिर्डीकरांसाठी चांगली बातमी मिळाली असून आता साईबाबांच्या आशिर्वादाने विश्वस्त मंडळात स्थानिकांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय शिर्डीकरांनी गटतट विसरून एकत्र यायला हवे.

पंधरा दिवसांचा कालावधी वाढून मिळाल्याने ग्रामस्थांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करावे, असे मत शिर्डीतील (Shirdi) ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे सरकारकडून विश्वस्तपदांची सोशल मीडियावर जाहीर झालेली यादी याबाबत अजूनही सस्पेन्स (The list released on social media is still a mystery) कायम आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com