साई संस्थानचे माजी विश्वस्त प्रभाकर बोरावके यांचे निधन

साई संस्थानचे माजी विश्वस्त प्रभाकर बोरावके यांचे निधन

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील साईचरित्रकार दासगणू महाराज यांचा सहवास लाभलेले साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त व साईगंगा मिनरल वॉटर, हॉटेल स्पॅन, साई बाईक्सचे सर्वेसर्वा कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर तुकाराम उर्फ पी. टी. बोरावके (वय 92) यांचे नुकतेच निधन झाले. त्याच्या मागे अनिल व नितीन दोन मुले व सुना नातवंडे असा परिवार आहे.

शिर्डी साईबाबांच्या समाधीवर ते गेल्या 40 ते 45 वर्षांपासून दररोज नित्यनियमाने फुले वाहत. साई पुजेचाही त्यांच्या घराण्याला मान होता. त्यांचे वडील कै. तुकाराम बोरावके हे देखील नि:स्सीम साईभक्त होते, त्यांना देखील साईबाबांचा सहवास लाभला होता. ब्राम्हणगाव शेतातून ते दररोज साईपुजेला फुले नेत. त्यानंतर त्यांचे चिरंजीव कै. पी. टी. बोरावके यांनी हा वसा जपला. कोल्हे कारखान्याच्या 1978 ते 1984 संचालक मंडळात त्यांचा सहभाग होता. 10 ऑगस्ट 1982 ते 10 ऑक्टोबर 1983 या काळात ते कारखान्याचे उपाध्यक्ष होते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्याबरोबर विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी काम केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com