साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड

साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी राज्यात प्रगतीपथावर नेलेल्या साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विवेक बिपीनदादा कोल्हे यांची बिनविरोध निवड करण्यांत आली.

विवेक कोल्हे यांच्या नावाची सुचना उपाध्यक्ष रेवजी रूंजाजी आव्हाड यांनी मांडली तर त्यास संचालक संभाजीराव रक्ताटे यांनी अनुमोदन दिले. साई संजीवनी बँकेचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर विवेक कोल्हे यांची निवड करण्यांत आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक एन. जी. ठोंबळ यांनी काम पाहिले तर श्री. रहाणे यांनी सहकार्य केले.

याप्रसंगी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, संचालक रामुशेठ पटेल, गोरख आहेर, बापूसाहेब बारहाते, विश्वनाथ जावळे, विधीज्ञ अशोकराव टुपके, नारायण अग्रवाल, गंगुबाई विश्वनाथ जावळे, संगीता बापूसाहेब बारहाते, शरदराव गवळी आदी उपस्थित होते.

सत्कारास उत्तर देताना विवेक कोल्हे म्हणाले, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या रिक्त जागेवर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याचे सोने करू. त्यांनी घालून दिलेल्या आर्थीक शिस्तीचे तंतोतंत पालन करू. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊ.

विवेक कोल्हे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड, उपाध्यक्ष विलास कुलकर्णी, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बोरावके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. संचालक संभाजी रक्ताटे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.