साईपालखी रस्त्यावर स्वच्छतेसाठी कचरापेटी

सूर्यतेज संस्था, ज्योती पतसंस्था व साईभक्तांचा सहभाग
साईपालखी रस्त्यावर स्वच्छतेसाठी कचरापेटी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

सूर्यतेज संस्था,कोपरगांव वतीने भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षात स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत श्री रामनवमी उत्सव निमित्ताने कोपरगांव ते शिर्डी रस्त्यावर सलग आठवे वर्षी भाविकांना खाद्य व पेय पदार्थ वाटप केंद्रावर मोफत कचरापेटी उपलब्ध करून दिली आहे.

सूर्यतेज संस्थेच्या अभियानाला बी.एस.एन.एल.चे संचालक व ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष रविद्र बोरावके, अजित शिंगी,साई गांव पालखीचे मनोज कपोते, सेवानिवृत्त नायब तहसिलदार खिंवराज दुशिंग, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी, विद्यार्थीनी, स्वच्छतादूत पथक, महाराष्ट्र हरित सेना यांचे सहकार्य लाभले आहे. स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छता जलशक्ती वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान अंतर्गत शिर्डी उपविभाग व कोपरगाव तालुक्यात अनेक उपक्रम राबविले आहे. कोपरगांव ते शिर्डी या सोळा किमी महामार्गावर श्रीरामनवमी उत्सवानिमित विविध ठिकाणच्या अनेक साई पालखी पायी चालून मार्गस्थ होतात.या भाविकांना साईभक्तांकडून श्रध्देने खाद्य व पेय पदार्थ वाटप केले जाते.

साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेला कोपरगांव ते शिर्डी पवित्र मार्गावर स्वच्छता रथातून तात्पुरत्या स्वरूपाच्या सुमारे 250 कचरापेटी उपलब्ध करून देवून कचरापेटी द्वारे कचरा संकलन अभियान राबविण्यात आले. गेल्या दोन दिवसापासून मोफत कचरापेटी वाटप केली आहे.त्यावर आपण सारे साई भक्त साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेला पालखी मार्ग स्वच्छ ठेवू या. या संदेशाबरोबर ओला, सुका, प्लास्टिक आणि घातक कचरा वर्गीकरण, उन्हाळ्यात पक्षांना खाद्य आणि पाणी ठेवण्याचे आवाहन, हरितसेना वृक्षसंवर्धन,माझी वसुंधरा अभियान संदेश दिला आहे.

तसेच कडक उन्हाच्या तिव्रतेमुळे व्याकूळ पक्षांना खाद्य आणि पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.स्वच्छता अभियानात संस्थेचेे अँड. महेश भिडे, मिलिंद जोशी, भाऊसाहेब गुडघे, दिपक शिंदे, प्रशांत लकारे, अनंत गोडसे, रविंद्र भगत, अनिल अमृतकर, अतुल कोताडे, अमोल पवार, महेश थोरात, विजय कासलीवाल, राजेंद्र गायधनी, ललीत चौघुले, सतिष सांगळे, विनय कोठावदे, संदिप ठोके, कल्पेश टोरपे यांचेसह साई स्वयंसेवकांच्या सहकार्याने साई पालखी रस्ता स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Related Stories

No stories found.