साईभक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी येताना ऑनलाईन दर्शन पास घेवूनच यावे - बानायत

साईभक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी येताना ऑनलाईन दर्शन पास घेवूनच यावे - बानायत

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

देशात व राज्यात करोना विषाणुचा ओमायक्रॉन या व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता भाविकांनी व संस्थान कर्मचार्‍यांनी डबल मास्क लावणे, हात सॅनिटायझेशन करणे व सामाजिक अंतराचे पालन करणे. तसेच साईभक्तांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी श्रींच्या दर्शनाकरता येताना ऑनलाईन दर्शनपास घेवुनच यावे, असे आवाहन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले.

राज्य शासनाच्या आदेशान्वये दि. 07 ऑक्टोबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन सध्या कोरोना विषाणुचा ओमायक्रॉन या व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेवुन देशात व राज्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात साईभक्तांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच दोन किंवा दोन पेक्षा जास्त दिवस सलग सुट्टीचे कालावधीत, गुरुवार, शनिवार, रविवार व शासकीय सुट्टी अथवा महत्वाचे धार्मिक दिवशी श्री साईबाबांचे दर्शन घेऊ इच्छिणार्‍या साईभक्तांनी या कालावधीत शिर्डी येथे श्रींचे दर्शनाकरीता येतानी संस्थानच्या ेपश्रळपश.ीरळ.ेीस.ळप या संकेतस्थळावरुन आगाऊ ऑनलाईन दर्शन पास बुक करावा व ऑनलाईन दर्शन पास निश्चित झाल्यानंतरच श्री साईबाबांचे दर्शनाकरीता शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार भाविकांनी डबल मास्क लावणे, वारंवार हात सॅनिटायझेशन करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, दर्शनास प्रवेश करताना दर्शनरांगेतील इतर वस्तुंना आणि श्रींच्या समाधीस स्पर्श करु नये. याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पूजेचे साहीत्य नेण्यास सक्त मनाई आहे. तसेच पदयात्री पालखी मंडळांनी पालखी घेवुन शिर्डी येथे येवू नये. जे साईभक्त आजारी आहेत अशा साईभक्तांनी दर्शनाकरीता येऊ नये.

दर्शन पास वितरण काऊंटरवर होणार्‍या गर्दीमुळे आपली होणारी गैरसोय टाळण्याकरीता साईभक्तांनी ऑनलाईन दर्शनपास उपलब्ध करुन निर्धारीत वेळेत श्रींच्या दर्शनाकरीता यावे, असे आवाहन करुन कर्तव्यावर असणार्‍या संस्थान कर्मचार्‍यांना विशेष दक्षता घेण्याच्या सुचनाही श्रीमती बानायत यांनी दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com