साईभक्तांच्या गर्दीनी शिर्डीचे रस्ते फुलले

साईभक्तांच्या गर्दीनी शिर्डीचे रस्ते फुलले

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांच्या गर्दीचा ओघ शनिवारी मोठ्या संख्येने वाढल्याने साईंच्या पुण्यनगरीतील सर्वच रस्ते भक्तांच्या गर्दीने फुलल्याचे दिसत होते. साई दर्शनासाठी ऑनलाईन पास असणे अत्यावश्यक केल्याने अनेक भाविकांना साईबाबांच्या समाधी दर्शनाऐवजी मंदिराचा कळस तसेच द्वारकामाई व चावडीचे दर्शन घेऊन समाधान मानावे लागले.

साईबाबा संस्थान प्रशासनाच्यावतीने साई दर्शनासाठी दररोज फक्त पंधरा हजार भाविकांना दर्शनपास देण्याची मर्यादा ठेवली असल्याने अनेक भक्तांना ऑनलाईन पास मिळत नाही तर ऑनलाईन दर्शन बुकिंग करून आलेल्या साईभक्तांना पासची प्रिंट काढून घेण्यासाठी झेरॉक्स सेंटर व कॉम्प्युटर सेंटर अथवा कॅफेबाहेर रांगेत उभे राहून तासनतास प्रिंटसाठी प्रतीक्षा करावी लागली. अपवाद वगळता अनेक ठिकाणी प्रिंट काढून देण्यासाठी साईभक्तांची आर्थिक लूट केली असल्याचे बोलले जात आहे.

गेली दीड-दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे साईंचे दर्शन व आशीर्वाद न घेतल्याने भाविक साईसमाधी दर्शनासाठी आतुर झाल्याने भाविकांची शिर्डीत दिवसेंदिवस आता चांगलीच गर्दी वाढत आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यात करोनाचा आलेख उतरला जात आहे. राहाता तालुक्यातील करोनाची संख्याही घटली असून साईबाबा संस्थानने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने साईभक्तांच्या दररोजच्या दर्शनाच्या संख्येची मर्यादा 15 हजारांहून अधिक वाढवणे आता गरजेचे बनले आहे. अनेक भाविक साईसमाधीचे दर्शन मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करत आहे

शनिवार-रविवार शिर्डीत साईभक्तांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर छोट्या पालख्या बाहेर राज्यातील या ठिकाणी आल्याचे निदर्शनास आले. भक्तांची गर्दी शिर्डीत वाढल्याने नगर-मनमाड महामार्गासह शहरातील अनेक रस्ते भक्तांच्या गर्दीने फुलून गेली होती. साई संस्थानने स्वतःच्या खिडकीवर पासेस देणे चालू करावेत आणि आधारकार्डवरून पास दर्शन पास सुरू करावेत, अशी अनेक साई भक्तांची मागणी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com