काळाबाजार रोखण्यासाठी साईंच्या व्हीआयपी दर्शन पास नियमात बदल

काळाबाजार रोखण्यासाठी साईंच्या व्हीआयपी दर्शन पास नियमात बदल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाचा व्हीआयपी दर्शनपास (Sai Baba Darshan VIP Pass) मिळवायचा असेल तर आता नवीन नियमावली (New Rules) लागू करण्यात आली आहे. दर्शनापास किंवा आरतीचा पास घेताना आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र (Aadhaar Card and Identity Card) देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. दर्शनपासचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी साईसंस्थानने हा निर्णय घेतला आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी साईंच्या व्हीआयपी दर्शन पास नियमात बदल
समन्यायी पाणी वाटप : मराठवाड्याचे भागेल पण.. नगर, नाशिकच्या शेतीचे काय ?

साईबाबांच्या दर्शनासाठी (Sai Baba Darshan) जगभरातून भाविक शिर्डीत (Shirdi) येत असतात. अनेक जणांना झटपट दर्शन करून निघण्याची घाई असते. अशावेळी एजंट त्यांची फसवणूक करून लुटमार करत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे आता साईभक्तांना (Sai Devotee) स्वतः पास काढावा लागणार आहे. यासोबत आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी साईंच्या व्हीआयपी दर्शन पास नियमात बदल
राहात्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय

आरती पास घेण्यासाठी येणार्‍या सर्व साईभक्तांना (Sai Devotee) आपले आधारकार्ड ऑनलाईन रजिस्टर करावे लागणार आहे. साईबाबा संस्थानच्या sai.org.in या ऑनलाईन पोर्टलवर सामान्य साईभक्तांना पेड दर्शन आणि आरती पासची आगाऊ बुकिंग करता येणार आहे. आजी माजी विश्वस्त, प्रतिष्ठित नागरीकांच्या शिफारशीनुसार देण्यात येणार्‍या पाससाठीही हा नियम लागू केला असून आता भक्तांचे आधारकार्ड आणि नावे शिफारस करताना द्यावी लागणार आहेत. नवीन निर्णयानंतर साईभक्तांना पास मिळण्यास उशीर होणार असला तरी या निर्णयामुळे साईभक्तांची लूट थांबणार आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी साईंच्या व्हीआयपी दर्शन पास नियमात बदल
पात्र माजी खंडकरी शेतकर्‍यांना 1 एकरापेक्षा कमी जमिनीचे वाटप होणार

साईबाबांच्या व्हीआयपी दर्शनासाठीचे (Sai Baba VIP Darshan) नियम पेड दर्शनपास व आरती पास साठी ओळखपत्र अनिवार्य, पेड दर्शनपाससाठी एकाचे ओळखपत्र तर इतरांचे नाव अनिवार्य, आरती पाससाठी आरतीला असणार्‍या सर्व सदस्यांचे ओळखपत्र अनिवार्य, ऑनलाईन दर्शनपास कोटा प्रतीतास 500 वरून एक हजार करण्यात आला असून sai.org.in या अधिकृत वेबस्थळावर पेड दर्शनपास व आरतीपास उपलब्ध होणार आहे. सामान्य दर्शन रांगेतून थेट प्रवेशासाठी नेहमीप्रमाणे कोणतीही अट नाही.

काळाबाजार रोखण्यासाठी साईंच्या व्हीआयपी दर्शन पास नियमात बदल
पुणतांबा ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय नेत्यांची सावध भूमिका
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com