साई संस्थानच्या कर्मचार्‍याची निळवंडेच्या जंगलात आत्महत्या

शिर्डीच्या आठजणांविरुद्ध गुन्हा, आरोपीत राजकीय व्यक्तीच्या भावाचा समावेश
साई संस्थानच्या कर्मचार्‍याची निळवंडेच्या जंगलात आत्महत्या

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर (Sangmner) तालुक्यातील निळवंडे (Nilwande) शिवारातील रस्त्याच्याडेच्या खिंड जंगलात शिर्डी (Shirdi) येथील साई संस्थानच्या (Sai Baba Trust Worker) कर्मचार्‍याने बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. दिलीप बाबासाहेब सांभारे ( वय 48 वर्षे रा. श्रीराम नगर, कनकुरी रोड, शिर्डी ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात (Sangmner Police station) पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

निळवंडे ते कौठेकमळेश्वर रस्त्यालगतच्या (Nilwande Kauthekamleshwar Road) निळवंडे (Nilwande) शिवारातील खिंड जंगलात (Khind forest) दिलीप बाबासाहेब सांभारे यांचा मृतदेह बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलीस पाटील अशोक कोल्हे (Police patil Ashok kolhe) यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली व संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलीस हे.कॉ. विष्णू आहेर यांनी मृतदेह झाडावरून खाली घेत पंचनामा केला.

सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे, कौठेकमळेश्वरचे उपसरपंच नवनाथ जोंधळे, पोलीस पाटील अशोक कोल्हे यांनी त्यांना सहाय्य केले. त्याशिवाय घटनास्थळाजवळ एक दुचाकी आढळून आली. दिलीप सांभारे हे साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात आचारी (Sai Baba Sansthan) म्हणून काम करीत होते. त्यांच्या मृतदेहाजवळ आत्महत्येपूर्वी वहीत लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली. आपणावर ही वेळ आणण्यास जबाबदार पाच जणांची नावे मयत सांभारे यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली असून 15 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार त्यात नमूद आहे.

याप्रकरणी हे. कॉ. विष्णू आहेर यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वेणुनाथ सूर्यभान गोंदकर ( रा. शिर्डी ), अनिता दिलीप सांभारे (रा. शिर्डी ), नानासाहेब श्रावण जाधव ( रा. शहा ), मंदा बाळाजी जाधव ( रा. शहा ) व भीमा बाळाजी जाधव ( रा शिर्डी ) तसेच व्याजाचे पैसे दिलेल्या तीन अज्ञात व्यक्ती असे आठजणांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यातील एक आरोपी हा राजकीय व्यक्तीचा भाऊ आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड, हे. कॉ. विष्णू आहे, पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर अधिक तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com