साई संस्थानच्या विश्वस्तपदी खेवरे यांची निवड करण्याची मागणी
खेवरे

साई संस्थानच्या विश्वस्तपदी खेवरे यांची निवड करण्याची मागणी

उंबरे |वार्ताहर| Umbare

साई संस्थानच्या विश्वस्तपदी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांची निवड करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले, खेवरे हे शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेऊन काँग्रेस आणि पुरोगामी विचाराचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात शिवसेनेची भगवी गुढी यशस्वीपणे उभी केली. जिल्ह्यात शिवसैनिकांची मोठी ताकद निर्माण केली.

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यातील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ठाकरे व खेवरे यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. ठाकरे कुटुंबियांना खेवरे यांचे नगर जिल्ह्यातील कार्य माहिती आहे. आक्रमक वक्तृत्व, आधार देणारे नेतृत्व आणि दातृत्व असलेल्या खेवरे यांना विश्वस्त पदाची संधी देण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. खेवरे यांच्या नियुक्तीमुळे साई संस्थानचे अनेक प्रश्न सरकार दरबारी मांडून त्यांना वाचा फोडण्याचे काम होईल. तर खेवरे यांना विकासाची दूरदृष्टी असल्याने विश्वस्तपदाचाच सन्मान होऊन साईनगरीचा विकास होणार असल्याचे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com