साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांचा रामराम

साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांचा रामराम

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा हा संदेश जगभरात पोहचवणार्‍या व राज्यात नावलौकिक मिळवलेल्या साईबाबा संस्थानच्या (Sai Baba Trust) सुपर स्पेशालिटी रुग्णालयात (Super Specialty Hospital) साई समाधी शताब्दी वर्षानंतर अनेक दिग्गज डॉक्टरांनी (Doctor) रामराम ठोकला असून या ठिकाणी उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची हेळसांड होत असल्याने साई संस्थान प्रशासनाने (Sai Institute Administration) दोन्ही रुग्णालयात लक्ष घातले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे मत शिर्डी (Shirdi) येथील ज्येेष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

साईबाबांंनी (Sai Baba) आयुष्यभर रुग्णांची सेवा (Patient service) केली. रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा आहे याचे महत्त्व संस्थानच्या माध्यमातून सुरू असलेल्या दोन्ही रुग्णालयात दिल्या जाणार्‍या सेवेतून पटवून दिले जात आहे.साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात (Sai Baba Super Specialty Hospital) सर्वात जास्त हृदयरोगाचे रुग्ण येत असतात. तसेच या ठिकाणी बायपास सर्जरी करणार्‍या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनअंतर्गत (Mahatma Phule Jeevandayi Yojana) अनेक शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध असल्याने किडनी रोग, मेडिसिन, मेंदूरोग, अस्थिरोग, जनरल सर्जन, सोनोलॉजिस्ट आदी तज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्णांचा ओढ आहे.

साईबाबांच्या श्रद्धेपोटी या रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. त्यामुळे एकेकाळी राज्यात अव्वल स्थान मिळवलेल्या श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात शताब्दी वर्षानंतर विविध रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी रामराम ठोकला आहे. एकप्रकारे राजीनाम्याचे सत्र सुरू झाले असून ते थांबायला तयार नसल्याचे चित्र आहे तर नवीन डॉक्टर येथे येण्यास इच्छुक नाही. अनेकदा भरतीसाठी विविध वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या आहेत, मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही.

न्युरोसर्जन डॉ. किशोर गोडगे, जनरल सर्जन डॉ. थोरात, ऑर्थोपेडीक डॉ. प्रशांत, सोनोलॉजिस्ट डॉ. राजश्री शिंगारे, एमडी मेडीसिन डॉ. अविनाश जाधव यांच्यासह अतिदक्षता अपघात विभागातील डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्याबरोबर अनेक आरएमओ डॉक्टरांनी साईबाबा रुग्णालयास रामराम केला आहे.

त्याच्या मागील कारण जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता असे समजले की, येथील डॉक्टरांना संस्थानकडून दिला जाणारा इन्सेटिव्ह, अत्यल्प पगार, तातडीने निवासस्थानाची सोय उपलब्ध नाही आणि अकुशल कामगारांची दडपशाही या प्रमुख कारणाने या ठिकाणी अनुभवी आणी तज्ञ डॉक्टर काम करण्यासाठी इच्छुक नाही.

चतुर्थी श्रेणीतील वशिल्याचे कर्मचारी यांना राजकीय नेत्यांचा अभय असल्याने बाहेरचा डॉक्टर तग धरू शकत नाही.एखादी अपवादात्मक घटना घडली की स्थानिक पातळीवर आंदोलने, उपोषण करून येथील डॉक्टरांची मानसिकता बदलवून टाकली आहे.त्यामुळे रुग्णांवर प्रामाणिकपणे उपचार करण्यासाठी कोणीही धजावत नसल्याचे सत्य समोर आले आहे. साईबाबा संस्थानवर दोन वर्ष विश्वस्त नव्हते परंतु आता नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साईबाबांच्या रुग्णसेवेचा वसा जपण्यासाठी दोन्ही रुग्णालयात जातीने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी शिर्डीतील ज्येेष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com