साईबाबा संस्थानच्या 598 कामगारांना स्थायी नेमणूक देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करु

आ. प्रशांत बंब यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बानायत यांना निवेदन
साईबाबा संस्थानच्या 598 कामगारांना स्थायी नेमणूक देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करु

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी संस्थानच्या कामगारांना न्याय मिळण्यासाठी आपण वेळप्रसंगी राज्याच्या विधानसभेत आवाज उठवू तसेच हा प्रश्न सुटावा म्हणून सर्वच स्तरावर प्रामाणिकपणे प्रयत्न करू व 1052 प्रमाणेच या 598 कामगारांना स्थायी नेमणूक देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करु, अशी ग्वाही गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे आ. प्रशांत बंब यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

साईबाबा संस्थानमधील आकृतीबंधामधील उर्वरीत 598 पात्र कर्मचार्‍यांना कायम करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना आ. प्रशांत बंब यांनी दिले. यावेळी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, नवनाथ थोरे, निखील पिपाडा आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त शिर्डी अधिनियम 2004 च्या अधिनियमातील द. म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 1994 ते दि. 22 ऑगस्ट 2004 अखेरपर्यंतचे एकुण 1687 कामगार संस्थानमध्ये काम करत होते. 1052 कामगारांना श्री साईबाबा संस्थान आस्थापनावर कंत्राटी पध्दतीने ऑर्डर दिली आहे व 7 ऑगस्ट 2009 रोजी जो शासन मान्यता मिळालेल्या मंजुर आकृतीबंध तयार करण्यात आला त्यानुसार अधिनियम 2004 अधिनियमातील 22 ऑगस्ट 2004 अखेरपर्यंतचे एकूण कामगार 1687 पैकी 1026 जण स्थायी पदात बसले व त्यातील राहिलेले 635 पैकी 540 कामगार हे स्थायी पदात बसले तर 121 कामगार स्थायी पदातून बाद झाले.

आतापर्यंत 635 पैकी अधिनियमातील राहिलेले 598 स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती दिलेली नाही. तरी वरील बाबत सखोल अभ्यास करुन 598 कर्मचार्‍यांना न्याय द्यावा. याबाबत साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्याशीही चर्चा करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन यावेळी आ. बंब यांनी दिले.

यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कर्मचार्‍यांच्या संयमाचा अंत पाहु नये. गेल्या 22 वर्षापासून साईबाबांची सेवा करीत असताना कर्मचार्‍यांना कायम करण्यासंदर्भातील प्रश्नावर सातत्याने उदासिनता दिसून येत आहे. या कर्मचार्‍यांच्या बाबतीत ठोस निर्णय घेण्यात यावा. 2004 साली आम्ही शिर्डी ते मंत्रालय अशी पायी दिंडी काढण्याचे आंदोनल करण्याची घोषणा केल्यानंतर 1052 कामगारांना न्याय मिळाला. संस्थानने उर्वरित कामगारांना टप्प्याटप्प्याने घेवू, असे आश्वासन दिले होते. परंतु बरेच कामगार निवृत्त झाले तरी ते कामय झाले नाही. गेल्या 20 वार्षापासुन कामगारांना तुटपुंजा पगार मिळतो, असे डॉ. पिपाडा यावेळी म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com