
राहाता |वार्ताहर| Rahata
श्री साईबाबा संस्थान माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी एमबीबीएस, बीएससी नर्सिंग, लॉ अशी विविध प्रकारची महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली.
राहाता येथे मुस्लिम बांधवांच्यावतीने शनिवारी सायंकाळी शहरात रमजान ईद निमित्त शीरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी इसाक पठाण होते. याप्रसंगी साईबाबा संस्थानचे विश्वस्त अविनाश दंडवते, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस निलेश कोते, तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, शिर्डीचे पोलिस उपाधीक्षक संजय सातव, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, काँग्रेस शहराध्यक्ष नितीन सदाफळ, मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, मनसे युवा सेना जिल्हाध्यक्ष विजय मोगले, नगरसेवक सागर लुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. आशितोष काळे म्हणाले, शिर्डी परिसरातील विद्यार्थ्यांना जवळच शिक्षणाची व्यवस्था व्हावी याकरिता संस्थानच्या माध्यमातून लवकरच विविध प्रकारचे महाविद्यालय सुरू करणार असून त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर तात्काळ कारवाई होण्याकरिता पाठपुरावा सुरू आहे. रमजान ईद व अक्षय्य तृतीया हे सण एकाच दिवशी आल्याने हिंदू-मुस्लीम या दोन समाजात एकोप्याचे दर्शन पाहायला मिळाले. दोन वर्षात कोविडमुळे आपले सर्वांचे अनेक जवळची माणसे गेली. चौथी लाट येणार असे बोलले जाते. यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाज बांधवांसाठी 2 कोटी 10 लाख रुपये निधी आणला आहे. शरद पवार, ना. अजित पवार, ना. जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांनी मला संस्थांमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यांच्या माध्यमातून परिसरात विविध विकास कामे करण्याचा मानस आहे. संध्या संस्थानमध्ये काही विश्वस्तांच्या नेमणुका बाकी आहे. कोर्टाने विश्वस्त मंडळाला धोरणात निर्णय घेऊ नका. फक्त दैनंदिन कामे करा अशा सूचना केल्या आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळाला विकास कामे करण्यासाठी मर्यादा आहे. येथील मुस्लिम समाजाला कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरु आहे. सदरचा प्रश्न लवकरच मार्गी लावू. साईबाबा संस्थान माध्यमातून परिसरात विकास कामे करायची आहे आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे ती निश्चित केली जातील, असे ना .काळे यांनी सांगितले.
यावेळी विश्वस्त अविनाश दंडवते, निलेश कोते, मौलाना अरिफ, रज्जाक शेख, शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, पोलीस उपअधिक्षक्ष संजय सातव, मुश्ताक शहा यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अनुप दंडवते, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष गुलशर शेख, जाईद दारुवाले, भगवान टिळेकर, रंजीत बोठे, ज्ञानेश्वर गाडेकर, युनूस पठाण, अलीम शेख, शौकत सय्यद, इरफान शेख, इरफान पठाण, आनंद शहा, अनिल माळी, हेमंत आनप, समीर बेग, सोपान लांडगे, महंमद शेख, सुलेमान शेख, सद्दाम शेख यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांना शीरखुर्माची मेजवानी देण्यात आली.