साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटेंची अवघ्या तीन महिन्यात बदली

तुकाराम मुंडे, प्रवीण गेडाम याच्या नावाची चर्चा
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी
बगाटेंची अवघ्या तीन महिन्यात बदली

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच.बगाटे यांची अवघ्या

तीन महिन्यात बदली झाली असून महाराष्ट्र राज्य अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारीपदी वर्णी लागल्याने आता शिर्डी संस्थानची सुत्रे कोणाच्या हातात देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्तीसाठी प्रथम पसंती तुकाराम मुंडे तसेच प्रविण गेडाम यांना आहे.

दरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सि.ओ. के.एच. बगाटे यांनी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सुत्रे दि.11 आँगस्ट 2020 रोजी घेतले होते. मात्र अवघ्या तिनच महिन्यात त्यांची बदली झाली असून महाराष्ट्र राज्य अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. यापूर्वी अरुण डोंगरे यांची देखील अवघ्या पाच महिण्याच्या कालावधीतच बदली झाली होती.त्यामुळे आता साईबाबा संस्थानचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्व साईभक्त ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्‍या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे तसेच प्रवीण गेडाम यासारख्या अधिकार्‍यांना पसंत आहे. देशात नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान तसेच अडिच हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या साईबाबा संस्थानवर प्रामाणिक आणि कडक अधिकारी नेमण्यात जेणेकरून संस्थानच्या हजारो कामगारांना न्याय मिळेल अशी मागणी कामगार वर्गामधून होत आहे.

याठिकाणी अधिकार्‍यांपेक्षा प्रभारी राजला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते. त्यामुळे कामगारांचे प्रश्न वरीष्ठांपर्यत पोहचत नसल्याने त्यांना न्याय मिळत नाही ही शोकांतिका आहे.

शिर्डीकरांवर संकट काही कमी होईना

आतापर्यंत जे अधिकारी साई संस्थानला लाभले. त्यापैकी सगळ्यात चांगली व लोकहीताचे निर्णय घेणारे म्हणून बगाटे होते.कर्मचार्‍यांच्या बाबतीत किंवा शिर्डी न.पं. ला निधी किंवा ग्रामस्थांच्या भावनेच्या विरोधात अध्यक्ष यांची भुमिका सतत असायची. यामध्ये बगाटे हे संस्थान कर्मचारी, न.पं. व शिर्डी ग्रामस्थांच्या बाजुने ठामपणे भुमिका बजावून अनेक निर्णय धडाडीने घेऊन अनेकांना न्याय दिला.. या अशा अधिकार्‍यांची 3 महिन्यात बदली होणे हे शिर्डीकरांसाठी प्रचंड नुकसानीचे व अहिताचे ठरणार आहे.. एकतर 8 महीन्यांपासून लॉकडाऊन त्यात नुकतेच चांगले अधिकारी लाभले आणि त्यांची लगेच बदली म्हणजे शिर्डीकरांवर मोठे संकट आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गोंदकर यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com