साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आ. रोहित पवार यांची निवड करावी

राकेश कोते यांची शरद पवार यांच्याकडे मागणी
साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी आ. रोहित पवार यांची निवड करावी
आ. रोहित पवार

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्यात अनेक तरुण नेतृत्व आहेत त्यात महाविकास आघाडीत देखील अनेक चांगले आणि कर्तबगार नेते असून कर्जत जामखेडचे आ .रोहित पवार यांनी अल्पावधीतच विकासाची दूरदृष्टी साधून राज्यभरात नावलौकिक प्राप्त केला असल्याने अशा कर्तृत्ववान युवा नेत्यास साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते यांनी पक्षाचेे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात श्री. कोते यांनी म्हटले आहे की शिर्डी साईबाबांची कर्मभूमी आहे.त्याच साईबाबांवर श्रद्धा असलेले लाखो करोडो भक्त आज जगाच्या कानाकोपर्‍यात आहेत. आपले महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करत आहे. सरकारच्या अधिकारात येणार्‍या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या माध्यमातून देखील भाविक आणि जनतेच्या हिताचे काम व्हावे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही विकासात्मक दृष्टीकोन असणारा आणि युवकांना संधी देणारा पक्ष म्हणून आहे. आपण वेळोवेळी युवकांना संधी देऊन त्यातून अनेक नेते घडवले आहे.

कर्जत जामखेडमध्ये जे एका मंत्र्याला जमले नाही ते काम अवघ्या वर्षभरात रोहित पवार यांनी करून दाखवले. न थकता विकासाचा सकारात्मक दृष्टीकोन नियोजनबद्ध राबवणारा युवानेता आज अहमदनगर जिल्ह्यात आहे. असे असताना माझ्यासह राज्यातील युवकांची आणि साईभक्तांची इच्छा आहे की आ. रोहित पवार यांच्याकडे साईबाबा संस्थानची सुत्रे द्यावीत त्यातून साईभक्त आणि परिसराचा नक्कीच विकास साधला जाईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com