साई प्रसादालय कोविड नियम पाळून भक्तांसाठी तातडीने सुरू करा

आमदार विखे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे मागणी
साई प्रसादालय कोविड नियम पाळून भक्तांसाठी तातडीने सुरू करा

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा मंदिरात (Sai Baba Temple) दर्शनासाठी ऑफलाईन पास (Offline Pass) उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाप्रमाणेच संस्थानचे प्रसादालय (Trust Prasadalaya) सुध्दा कोविडचे नियम पाळून भक्तांसाठी तातडीने सुरू करावे, अशी मागणी (Demand) आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे (Collector) केली आहे.

यासंदर्भात कोविड संकटानंतर प्रशासनाने राज्यातील मंदिरे सुरू (State Temple Open) करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंदिरात प्रवेशासाठी ऑनलाईन पासेसची सुविधा (Facilitate Online Passes) शिर्डी संस्थानने (Shirdi Trust) सुरू केली होती. ऑनलाईन पासेसची मर्यादा असल्याने शिर्डीत (Shirdi) येणार्‍या भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. यासंदर्भात आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा करून ऑफलाईन दर्शन पास सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीबाबत जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय केल्याने आ. विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांच्या पाठपुराव्याला यश आले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

ऑफलाईन दर्शन पास सुविधेच्या निर्णयाप्रमाणेच संस्थानचे प्रसादालय सुरू करण्याबाबतही प्रशासनाने आग्रही भूमिका घ्यावी, अशी मागणी आ. विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. कोविड नियमावलीचे पालन करून प्रसादालय सुरू केल्यास देशभरातून येणार्‍या भाविकांना या प्रसादालयाचा लाभ घेता येऊ शकेल ही बाब आमदार विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com