
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
साईबाबा समाधी मंदिरात हार, फुले, गुच्छ समाधीवर वाहाण्यास परवानगी मिळावी, यासाठी फुल उत्पादकांनी राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तशी मागणी केली आहे.
साईबाबा समाधीवर फुले वाहाण्यास परवानगी मिळाली तर फुलांची मागणी वाढून दरवाढ होईल अशी या फुलउत्पादकांची अपेक्षा आहे. याबाबतचे निवेदन आमदार विखे पाटील यांना फुलउत्पादकांना दिले आहे. मागील दोन अडीच वर्षापासुन करोना व त्यामुळे समाधी मंदिरात फुले, हार व गुच्छ वाहाण्यास बंदी व त्यामुळे फुलांचे पडलेले भाव व करोना मुळे किटकनाशके, बुरशीनाशके, याच्या वाढलेल्या किंमती तसेच वाढलेली मजुरी यामुळे गुलाब, झेंडू व एकूणच फुल शेती धोक्यात आली आहे. शिर्डीतील फुलांच्या बाजारपेठेवरच इतर शहरे कल्याण, सुरत, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कारंजा येथील फुलांचे दर फुटतात. आता शिर्डीलाच फुलांची मागणी कमी असल्याने मनमानी दर शेतकर्यांच्या पदरात पडत आहे.
या संदर्भातील निवेदन आमदार विखे पाटील यांना फुल उत्पादक संजय चोळके, नितीन कडू, नितीन लोंढे, रविंद्र डोंगरे, वाल्मिक गोर्डे, गणेश लोंढे, राजेंद्र लोंढे, सुधाकर बोठे, पंकज डोंगरे, सुधिर डोंगर, कैलास लोंढे, राजेंद्र अंभोरे, बाबासाहेब लोंढे, दत्तात्रय लोंढे, भारत लोंढे, गजानन लोंढे, नितीन लोंढे, नितीन चोळके, प्रताप डोंगरे, दिलीप चोळके, मंगेश गोर्डे, निखील कडू, जयसिंग कडू, बाळासाहेब लोंढे अदि उपस्थित होते.
यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी फुलउत्पादकांना सकारत्मक अश्वासन दिले. दोन दिवसात साईसंस्थानचे अध्यक्ष आमदार अशुतोष काळे व शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक घेवुन सकारात्मक मार्ग काढू असे अश्वासन फुलउत्पादकांना दिले असल्याची माहिती धनंजय चोळके यांनी दिली.