साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारीपदी वडगावे

साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारीपदी वडगावे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारीपदाचा डॉ. विजय नरोडे यांनी राजीनामा दिला असून

रिक्त झालेल्या वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. प्रितम वाडगावे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिले आहे. डॉ. वाडगावे यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.

साईबाबांंच्या रुग्णसेवेचा वारसा पुढे चालविण्याचे काम श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्यावतीने श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी तसेच श्री साईनाथ रुग्णालयात आजही मोठ्या जोमाने सुरू असून राज्यात तसेच परराज्यात ख्याती असलेल्या दोन्ही रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. प्रितम वाडगावे यांची वर्णी लागली आहे.

डॉ. विजय नरोडे यांनी वैद्यकीय संचालक पदाचा राजीनामा नोव्हेंबरमध्ये दिला होता. अखेर तो साईबाबा संस्थान प्रशासनाने मंजूर केला. बुधवार दि. 20 रोजी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे वैद्यकीय प्रशासक असलेल्या डॉ. प्रितम वाडगावे यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड केली असून सध्या दोन्हीही जबाबदारी ते व्यवस्थितपणे सांभाळत असल्याचे समजते. डॉ. विजय नरोडे यांनी वैद्यकीय अधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.

सध्या तेे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात वरिष्ठ अतिदक्षता विभाग तज्ञ म्हणून कामकाज बघत आहे. डॉ. वाडगावे यांच्या नियुक्तीनंतर दोन्ही रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर, आरएमओ तसेच परिचारिका, परिचारक आणि कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com