साईबाबा संस्थानचा ऑक्सिजन प्लॅन्ट सुविधा देण्यास सज्ज

साईबाबा संस्थानचा ऑक्सिजन प्लॅन्ट सुविधा देण्यास सज्ज
File Photo

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

रिलायन्स फाउंडेशन (Reliance Foundation) यांनी श्री साईबाबा संस्थान (Sri Saibaba Sansthan) संचलीत श्री साईनाथ रुग्णालयासाठी हवेतून ऑक्सिजन देणारा प्लॅन्ट सुविधा देण्यास सज्ज (Ready to provide oxygen plant facilities) झाला आहे.

सध्या जगभरात थैमान घातलेल्या करोना विषाणूची साथ परत एकदा वाढत असून सदरच्या विषाणूचा प्रादूर्भाव वाढत चाललेला आहे. सदर करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी श्री साईनाथ रुग्णालयात (Shri Sainath Hospital) करोना रुग्णांवर उपचार करावयाचे आहे. सदर रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता (Oxygen requirement) असते.

त्यासाठी रिलायन्स फाउंडेशन (Reliance Foundation) यांनी श्री साईबाबा संस्थान संचलीत श्री साईनाथ रुग्णालयासाठी हवेतून प्रतिमिनिटाला 1200 लिटर ऑक्सिजन निर्मिती करणारे (Oxygen generators) मे. अ‍ॅटलस कॉपको इंडिया, पुणे या कंपनीचा ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट हा देणगी स्वरुपात दिला आहे. सदर प्लॅन्टची उभारणी कंपनी इंजिनीअर्सद्वारे दिनांक 30 एप्रिल 2021 ते 30 मे 2021 या एक महिन्याच्या कालावधीत करण्यात आली. सदर प्लॅन्टद्वारे निर्माण होणारा ऑक्सिजन वायू 93 टक्के शुध्दतेचा आहे. सदर ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्टकरिता रिलायन्स फाउंडेशन, मुंबई यांचे पुरवठा आदेशानुसार ( As per Mumbai supply order) एकूण रुपये 1 कोटी 88 लाख 80 हजार इतका खर्च झालेला आहे.

सदर प्लॅन्टद्वारे श्री साईनाथ रुग्णालयातील अंदाजे 250 रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल. तसेच सदर ऑक्सिजन प्लॅन्टला कोणत्याही स्वरुपाच्या कच्च्या मालाची आवश्यकता नाही.

सदर प्लॅन्टचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते दिनांक 18 मे 2021 रोजी ऑनलाईन पद्धतीने झाले. तेव्हापासून आजपावेतो सदर प्लॅन्ट समाधानकारकरित्या कार्यरत आहे. गरजेनुसार सदर O2 Plant व्दारे रुग्णांना त्याची (ऑक्सिजनची) सुविधा देण्यास सज्ज आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com