कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी - ना. विखे

कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी - ना. विखे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

साईबाबा संस्थान ट्रस्टमधील कर्मचार्‍यांना नियमित करण्यासंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन शुक्रवारी मंत्रालयात करण्यात आले होते. या बैठकीला खा. सुजय विखे पाटील, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा शंकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी आणि संस्थान मधील कामगारांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

श्री. विखे पाटील म्हणाले, यापूर्वी संस्थानामध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. त्याच धर्तीवर उर्वरीत कामगारांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे संस्थानने पाठविला आहे. यासाठी आवश्यक असेल ती प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करणयाच्या सूचना त्यांनी विधी व न्याय विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

कोविड काळात साईबाबा मंदिरात हार, फुले आणि प्रसाद नेण्यास सुरक्षेच्या कारणास्तव बंदी करण्यात आली होती. मात्र श्रींचे समाधी मंदिरात हार, फुले आणि प्रसाद न्यायला परवानगी मिळावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे याबाबतही लवकरच निर्णय घ्यावेत, असेही विखे पाटील यांनी सूचित केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com