साईबाबा संस्थानचा 2 हजाराच्या नोटा बाबत 'हे' आवाहन

साईबाबा संस्थानचा 2 हजाराच्या नोटा बाबत 'हे' आवाहन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी (Shirdi) येथे येणार्‍या साईभक्तांनी (Sai Devotee) श्री साईबाबा संस्थानमधील देणगी (Donation) कक्ष किंवा इतर ठिकाणी 2000 रुपयाच्या चलनी नोटा स्विकारल्या जाणार नसलेबाबत तसेच श्री साईभक्तांनी 2000 च्या चलनी नोटा (2000 Currency Notes) दक्षिणा पेट्यांमध्येही टाकू नयेत, असे अवाहन श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केले आहे.

साईबाबा संस्थानचा 2 हजाराच्या नोटा बाबत 'हे' आवाहन
फोफसंडीत बुडालेल्या 'त्या' दोन तरुणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

श्री. हुलवळे म्हणाले, शिर्डी (Shirdi) येथे देश विदेशातून साईभक्त श्रींचे दर्शनासाठी येत असतात. दर्शन झाल्यानंतर साईभक्त देणगी (Sai Devotee Donation) कक्षात जाऊन संस्थानला देणगी (Donation) देत असतात. तसेच मंदीर व मंदीर परिसरात विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या दक्षिणापेट्यांमध्ये गुप्त स्वरुपात दान देत असतात. यामध्ये 2000 मुल्याच्या नोटांचाही समावेश असतो. तथापि रिझर्व बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India), मुंबई यांच्याकडील 19 मे 2023 रोजीचे परिपत्रकानुसार भारतीय चलनातील 2000 च्या चलनी नोटा दि. 30 सप्टेंबर 2023 नंतर बॅकेत जमा करता येणार नाहीत.

साईबाबा संस्थानचा 2 हजाराच्या नोटा बाबत 'हे' आवाहन
साईसंस्थान सर्वत्र साईमंदिरे उभारणार

यास अनुसरुन शिर्डी येथे येणार्‍या सर्व साईभक्तांना श्री साईबाबा संस्थान प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे. दि. 30 सप्टेंबर 2023 नंतर संस्थानमधील देणगी कक्ष किंवा इतर ठिकाणी 2000 च्या चलनी नोटा स्विकारल्या जाणार नाहीत. तसेच श्री साईभक्तांनी 2000 च्या चलनी नोटा दक्षिणा पेट्यांमध्येही टाकू नयेत, असे आवाहन साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com