साईबाबा हॉस्पिटल कोविडसाठी आरक्षित

हृदयविकार रुग्ण वेटींगवर; प्रशासनाबाबत रुग्णांमध्ये नाराजी
साईबाबा हॉस्पिटल कोविडसाठी आरक्षित

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

हृदयविकाराच्या शस्रक्रियेसाठी (Heart surgery) राज्यात नावलौकिक मिळवलेल्या शिर्डी शहारातील (Shirdi City) साईबाबा संस्थानच्या (Sai Baba Trust) श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी (Sri Saibaba Super Specialty) हॉस्पिटल कोविड रुग्णांसाठी (Covid Patient) बेड आरक्षित (Bed Reserved) केल्याने येथे येणार्‍या हृदयविकाराच्या रुग्णांना (Patients with heart disease) बेडअभावी महिनाभर वेटींग (Waiting) करावे लागत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन तसेच साईसंस्थानच्या कार्यप्रणालीवर रुग्णांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

कोविडच्या (Covid) दुसर्‍या लाटेत कोविड रुग्णांची (Covid patient in the second wave) संख्या वाढत गेल्याने गेली पाच ते सहा महिन्यांपासून साईबाबा संस्थानच्या (Saibaba Trust) श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी (Sri Saibaba Super Specialty) रुग्णालयात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोविड रुग्णांसाठी 140 बेड आरक्षित (Bed Reserved) करण्यात आले. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता सदरचा निर्णय योग्य होता. मात्र आता लसीकरणाची संख्या वाढल्याने रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच मृत्यूदर कमी आहे. एकीकडे असे असतानांही दुसरीकडे मात्र या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

खरे तर कोविड रुग्णांना (Covid Patient) संस्थानच्या निमगाव (Nimgav) येथील साईआश्रम फेज टुमध्ये उपचारासाठी भव्यदिव्य जागा तसेच शेकडो बेड उपलब्ध करून दिली असताना इतर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना रुग्णालयात अडचण निर्माण झाली आहे. विविध आजाराचे स्पेशालिटी डॉक्टरांची ओपीडी सुरू आहे. परंतू उर्वरित 50 बेडमध्ये कोणाला अ‍ॅडमीट करायचे हा गंभीर प्रश्न डॉक्टरांना भेडसावत आहे. चारशे किमीच्या अंतरावर एकमेव साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे की या ठिकाणी हृदयविकार, किडनी, मेंदू, हाडांसंबधी मोफत शस्त्रक्रिया होतात.

राज्यात आता अनलॉक करण्यात आल्याने शिर्डीमध्ये राज्यातून येणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. परंतु कोविड रुग्णांना आरक्षित असलेल्या बेडमुळे अ‍ॅडमीट करण्यासाठी इतर रुग्णांना महिनाभराची वाट पाहवी लागत आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांनी प्रशासन व संस्थानच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आम्ही साईबाबांच्या श्रद्धेपोटी येत असून संस्थानने साईबाबांच्या रुग्णसेवेचा वारसा जपावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात 2013 पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनोची अंमलबजावणी करायला सुरवात झाली. सदर योजनेत 971 आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हृदयरोग, किडनी, मेंदू, हाडासंबंधित शस्त्रक्रिया व आजारावर उपचार केले जातात. यामध्ये केशरी व पिवळे रेशन कार्डधारक कुटुंबाना या योजनेचा लाभ घेता येतो. यात 1 लाख 50 हजारापर्यंत शासनाकडून मोफत आरोग्य सेवा दिली जाते.

दरम्यान सन 2013 पासून साईबाबा संस्थानचे साईबाबा हॉस्पिटल राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत केल्या जाणार्‍या शस्रक्रियेत राज्यात अव्वल क्रमांकावर होते. या योजनेचे 1 जुलै 2017 पासून नामांतर करून त्यास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आले आहे. दरम्यान हृदयविकाराच्या रुग्णांना या ठिकाणी साईप्रसाद भोजनालय बंद असल्याने तसेच गाडीभाडे, लॉजींग भाडे परवडणारे नसल्याने महिनाभर वेटींग करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सदरचे कोविडचे बेड येथून दुसर्‍या ठिकाणी हलविण्यात यावे, अशी मागणी रुग्णांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com