
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
नववर्षानिमित्त बेंगलोर (Bangalore) येथील दानशुर साईभक्त (Sai Devotee) राजा दत्ता व सौ.शिवानी दत्ता यांनी 928 ग्रॅम वजनाचा 46 लाख 70 हजार 624 रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट (Gold Crown) श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिला असुन हा मुकुट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव (CEO Rahul Jadhav) यांच्याकडे सुपुर्त केला आहे.
करोनानंतर साईच्या शिर्डीत (Shirdi) साईभक्तांची गर्दी वाढली असून दानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो साईभक्त शिर्डीत (Shirdi) दाखल झाले आहेत. नव वर्ष साईच्या सानिध्यात साजरे करण्यासाठी साईभक्त उत्सुक असतात. त्यामुळे दरवर्षी साईदबारी साईभक्तांची मांदीयाळी असते. त्यात अनेक साईभक्तांकडून साईंच्या तिजोरीत भरभरून दान (Donation) टाकले जाते.