कोल्हे कारखान्याचा नवा विक्रम, तब्बल 'या' आकड्याला गवसणी

कोल्हे कारखान्याचा नवा विक्रम, तब्बल 'या' आकड्याला गवसणी

कोपरगाव | प्रतिनिधी

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक 8 लाख 11 हजार 633 मेट्रिक टन उसाचे गाळप केले. सहकारी तत्वावर उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मीती करण्यात कोल्हे कारखाना देशात पहिला ठरला असल्याचेही अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले.

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या 2020-21या गळीत हंगामाची सांगता माजीमंत्री शंकरराव कोल्हे, अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांच्या उपस्थितीत व संचालक ज्ञानेश्वर भगवंता परजणे, सौ.ललिता ज्ञानेश्वर परजणे या उभयतांच्या हस्ते शुक्रवारी करोना नियमांचे पालन करत झाली. प्रारंभी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे व शेतकी अधिकारी गोरखनाथ शिंदे यांनी गळीत हंगामबाबत माहिती दिली.

Title Name
शेतात आढळला जुना बॉम्ब, जमिनीवर आपटताच झाला स्फोट, दोन जखमी
कोल्हे कारखान्याचा नवा विक्रम, तब्बल 'या' आकड्याला गवसणी

बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांने असंख्य संघर्षावर मात करत नवनविन पायलट प्रकल्प सुरू करून ते यशस्वी केले. चालु गळीत हंगामात 8 लाख 11 हजार 633 मेट्रिक टन उसाचे गाळप केले. थेट उसाच्या रसापासून 83 लाख लिटर्स इथेनॉल उत्पादन घेतले आहे. राज्यात सर्वाधिक 2 लाख 7 हजार 540 मेट्रिक टन रॉ शुगर व 45 हजार मेट्रिक टन पांढरी साखर निर्यातीतही पहिला क्रमांक पटकावला आहे.

चालु गळीत हंगामात इतिहासात प्रथमच देशात थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मीती करण्यांचे धाडस कोल्हे कारखान्यांने यशस्वी करून दाखविले आहे. त्याचबरोबर पॅरासिटामोल या औषध निर्मीतीसाठीची उच्च तंत्रज्ञानावर आधारीत प्रयोगशाळेची निर्मीती करून विवेक कोल्हे हे अल्पावधीत प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्नशिल आहेत. उस उत्पादक सभासद शेतकरी, संचालक मंडळ व व्यवस्थापनांच्या सहकार्याने सहकारी कारखानदारीत जे जे नविन तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करत, जागतिकीकरणांच्या स्पर्धेत कुठेही मागे न राहता दैनंदिन गाळप क्षमता वाढवत संजीवनीने राज्याला अनेक दिशादर्शक प्रकल्प देत सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे, असे ते म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com