सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या अध्यक्षपदी विवेक कोल्हे तर उपाध्यक्ष घोडेराव बिनविरोध

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या 
अध्यक्षपदी विवेक कोल्हे तर उपाध्यक्ष घोडेराव बिनविरोध

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

देशात सहकार क्षेत्रात अग्रगण असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक विवेक बिपीन कोल्हे तर उपाध्यक्षपदी रमेश दादा घोडेराव यांची गुरूवारी बिनविरोध निवड करण्यांत आली. त्याबददल त्यांचा व अध्यक्ष बिपीन कोल्हे व उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांचाही सत्कार करण्यात आला.

सुरूवातीस कारखान्यांचे मार्गदर्शक बिपीन कोल्हे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी उज्वला गाडेकर व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी कारखान्यांची निवडणुक प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे बारकाईने पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला. बिपीन कोल्हे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी आजवर केलेल्या कार्याचा तसेच उल्लेखनीय बाबींचा आढावा घेवून त्यांचे विचारांचा वसा व वारसा अखंडीतपणे पुढे चालू ठेवू तसेच सर्व मान्यवर, सभासद, कामगार, हितचिंतक यांनी ऐतिहासिक 21 जागेसाठी 21 अर्ज ही सहकार चळवळीतील ऐतिहासिक नोंद होईल व आदर्शवत ठरेल याचे श्रेय सर्व सभासदांना व स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्यकर्तृत्वाला आहे, असेही ते शेवटी म्हणाले.

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी बिनविरोध निवडलेल्या सर्व संचालकांचे स्वागत केले. विवेक कोल्हे यांच्या नावाची सूचना त्र्यंबकराव सरोदे यांनी केली तर त्यास निवृत्ती बनकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी रमेश घोडेराव यांच्या नावाची सूचना विलासराव वाबळे यांनी केली तर त्यास बाळासाहेब वक्ते यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, मनेष गाडे, विलास माळी, सतिष आव्हाड, उषा संजय औताडे, सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे यांच्यासह अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, शिवाजीराव वक्ते, साईंनाथ रोहमारे, प्रदिप नवले, केशवराव भवर, कामगार नेते मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज, उपाध्यक्ष गणपतराव दवंगे, उध्दव विसपुते, संभाजी आहेर, भाउसाहेब दवंगे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक कोल्हे सत्कारास उत्तर देताना म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनीचा नावलौकीक मोठ्या संघर्षाने जपला. तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी संस्था जोपासून त्याचा वटवृक्ष निर्माण केला. सहकारात संजीवनीने पथदर्शी प्रकल्पाची सुरूवात सर्वप्रथम करत ते यशस्वी करून दाखविले आहेत. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सभासद शेतकरी, ज्ञात अज्ञात सहकारी यांच्या प्रेरणेतून कारखान्याचा लौकीक जागतिक पातळीवर उमटविण्यासाठी सर्व बिनविरोध निवडलेल्या संचालकांच्या सहकार्याने जाणीवपूर्वक प्रयत्न करू.

उपाध्यक्ष रमेश घोडेराव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची धुरा कोल्हे कुटूंबियांनी सतत तेवत ठेवत आपल्याला उपाध्यक्षपदाची संधी दिली त्याचे सोने करू. माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे म्हणाले, विवेक कोल्हे यांनी कमी वयात साखर कारखानदारी आणि औषधी उत्पादनाबद्दल माहिती घेवून त्यानुरूप कारखानदारीच्या मशीनरीमध्ये अत्याधुनिक बदल करून दैनंदिन गाळप क्षमतेबरोबरच ऊस उत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणार्‍या कोईमतूर ऊस संशोधन व विकास सोसायटीचे उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे. शेवटी संचालक विश्वासराव महाले यांनी आभार मानले. विवेक कोल्हे व रमेश घोडेराव यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com