बिराजदार मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांसह तिघे निलंबित

वाहनातून पडून जखमी झाल्याचा प्राथमिक अहवाल
बिराजदार मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांसह तिघे निलंबित

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmedagar

गुन्ह्यातील आरोपीला (Accused) ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात (Police Station)आणताना हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत भिंगार पोलीस ठाण्याचे (Bhingar Police Station) पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख (Sub-Inspector Bhaiyasaheb Deshmukh), सहायक फौजदार नैमुद्दीन शेख (Assistant Faujdar Naimuddin Shaikh) व पोलीस कर्मचारी पालवे (Palve) यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी दिली. दरम्यान मयत सादिक लाडलेसाहब बिराजदार (SadiK Ladlesaheb Birajdar) (वय 32 रा. मुकुंदनगर) हा वाहनातून पडून जखमी (injured) झाला असल्याचे शवविच्छेदनच्या प्राथमिक अहवालातून (Preliminary report of the autopsy) समोर आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोपी सादिक (Accused Sadik Birajdar) विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल असल्याने पोलीस कर्मचारी शेख आणि पालवे त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना भिंगार नाला (Bhingar Nala) परिसरात सादिकला पाच जणांनी मारहाण केली असल्याची फिर्याद सादिकची पत्नी रुक्सार बिराजदारने दिलेली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात खूनाचा प्रयत्न (Murder Try) कलमान्वये गुन्हा दाखल आहे. मात्र, आरोपी सादिकला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने चालू वाहनातून उडी मारली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला (The police filed a case) आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते. त्यानुसार या दोन्ही प्रकरणांची व घटनेची चौकशी (Investigation) करण्याचे आदेश अधीक्षक पाटील (SP Manoj Patil) यांनी शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे (City Deputy Superintendent of Police Vishal Dhume) यांना दिले होते. या चौकशीचा अहवाल (Investigation Report) ढुमे यांनी पाटील यांच्याकडे सादर केला आहे. पोलिसांकडून आरोपी पकडण्याच्या संदर्भात योग्य कार्यवाही झालेली नाही. जेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती, तेवढी घेतलेली नाही, असे प्राथमिक अहवालावरून दिसून येत असल्याचे अधीक्षक पाटील (SP Manoj Patil) यांनी सांगितले. मयत सादिक बिराजदार याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख (Sub-Inspector Bhaiyasaheb Deshmukh) यांच्याकडे होता. तसेच बिराजदार याला ताब्यात घेण्यासाठी सहायक फौजदार शेख (Assistant Faujdar Naimuddin Shaikh) व कर्मचारी पालवे (Police Palve) हे गेले होते. यांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून यामध्ये तिघे दोषी आढळले (Found guilty) असल्याने त्यांचे निलंबन (Suspended) करण्यात आले आहे.

सादिक याचे शवविच्छेदन पुणे येथे झाले. याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून डोक्याला व शरीराला जखम झाली असल्याचे यात म्हटले आहे. सविस्तर माहिती अद्याप आलेली नाही. मात्र फॉरेन्सिक विभागाकडून आलेल्या अहवालामध्ये सदरची घटना ही अपघात असल्याचे दिसून येत आहे, असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com