बिराजदार मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अहवालानंतर कारवाई

पोलीस अधीक्षक पाटील : पुणे येथे शवविच्छेदन
बिराजदार मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अहवालानंतर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पोलिसांच्या ताब्यात (police custody) असताना जखमी झालेला आरोपी सादिक लाडलेसाहब बिराजदार (Accused Sadik Ladlesaheb Birajdar) (वय- 32 रा. मुकुंदनगर) याचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू (Death) झाला आहे. याप्रकरणाचे गुड वाढले असून घटनेची संपूर्ण चौकशी व शवविच्छेदन अहवाल (Autopsy report) आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा पोलीस दलाने घेतला आहे. याला पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी दुजोरा दिला.

आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे (Bhingar Camp Police Station) कर्मचारी शेख आणि पालवे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना भिंगार नाला (Bhingar Nala) परिसरात सादिकला पाच जणांनी मारहाण (Beating)केली असल्याची फिर्याद सादिकची पत्नी रुक्सार बिराजदारने दिलेली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. मात्र, आरोपी सादिकला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने चालू वाहनातून उडी मारली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस कर्मचार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सादिकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सादिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सादिकचा मृत्यू झाला आहे. मयत सादिक याचा मृतदेह शनिवारी पहाटे शवविच्छेदनासाठी पुणे येथे पाठविण्यात आला आहे.

याबाबत अधीक्षक पाटील (SP Manoj Patil) यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, घडलेली घटना दुर्दैवी असून यासंदर्भात चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक (Special Inspector General of Police of Nashik Range) यांना घटनेचा अहवाल सादर केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपीचा मृत्यू झाल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आहे. सादिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथे पाठविण्यात आला असून बारकाईने शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सादिकचा मृत्यू कशामुळे झाला याचा उलगडा होणार आहे. मयताच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीचा (Demand) विचार आमच्या पातळीवर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

तपास सीआयडीकडे ?

सादिक बिराजदार याच्यावर गुन्हा दाखल असल्यामुळे त्याला दोन पोलीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणत असताना तो जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे सादिकचा कस्टडी मृत्यू झाल्याने हा तपास सीआयडीकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. कारण पोलीस कस्टडीत असताना एखाद्या आरोपीचा मृत्यू झाला तर त्याचा तपास सीआयडीकडे वर्ग होतो. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाने सर्व सोपस्कार पूर्ण केले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तसा अहवाल सीआयडीकडे दिला आहे.

आरोपींचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याच्या यापूर्वी जिल्ह्यात अनेक घटना घडल्या आहेत. नितीन साठे मृत्यू प्रकरण, नेवासा, राहुरी येथील कस्टडी मध्ये आरोपींचा मृत्यू झाला आहे. यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी वरिष्ठ पातळीवर मार्गदर्शन घेतले असून त्यांनी स्वतः याप्रकरणी लक्ष घातले आहे. पूर्वी घडलेल्या घटनांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com