जिल्हा परिषद अधिकार्‍यांच्या बदल्या

यादव, कदम यांची बदली तर ससे, किरवे जिल्ह्यात दाखल
जिल्हा परिषद अधिकार्‍यांच्या बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बर्‍याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ग्रामविकास विभागातील (Rural Development Department) जिल्हा परिषद अधिकार्‍यांच्या बदलीला (Transfer of Zilla Parishad officers) सुरूवात झाली आहे. मंगळवारी संपूर्ण स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव (Sanitation Department Deputy Chief Executive Officer Parikshit Yadav) आणि महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय कदम (Women and Child Welfare Department District Program Officer Sanjay Kadam) यांची बदलीचे आदेश आले.

दरम्यान, यादव यांना पदोन्नती असल्याने त्यांना नेमणुकीच्या ठिकाणाची प्रतिक्षा असून त्यांच्या जागेवर संगमनेरचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे (Sangamner group development officer Suresh Shinde) यांची नगरला जिल्हा परिषदेत बदली झाली आहे. दुसरीकडे मुळचे नगर जिल्ह्याचे रहिवासी असणारे आणि सातारा जिल्हा परिषदेत (Satara Zilla Parishad) कार्यरत असलेले मनोज ससे (Manoj Sase) यांची नगर जिल्हा परिषदेतील महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी पदावर बदली झोली आहे.

यासह कृषी विभागातील जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी (District Agriculture Development Officer Sunil Kumar Rathi) यांची नंदूरबार जिल्ह्यात उपसंचालक कृषी (आत्मा) या पदावर बदली झाली असून त्यांच्या जागेवर अकोले तालुक्यातील रहिवासी असणारे आणि चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असणारे शंकर किरवे (Shankar Kirve) यांची बदली झाली आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) आणखी काही अधिकार्‍यांच्या बदल्या होणार असून जिल्हा परिषदेत तीन वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या अन्य अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com