ग्रामीण भागात 17 हजार 434 करोना सक्रिय रुग्ण

आरोग्य विभाग : होम आयसोलेशनमध्ये 1 हजार 711 रुग्ण
ग्रामीण भागात 17 हजार 434 करोना सक्रिय रुग्ण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यांत करोना बाधितांचा वेग सुसाट आहे. त्याच प्रमाणात करोनावर मात करणार्‍यांची संख्या देखील मोठी असतांनाही मंगळवारी आरोग्य विभागाच्यावतीने दिलेल्या आकडेवारीनूसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाचे 17 हजार 434 रुग्ण असून शहरी भागात 4 हजार 554 रुग्ण आहेत.

जिल्ह्यात करोनाचा कहर वाढत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा कोविड रुग्णालय, खासगी कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटर (खासगी आणि शासकीय) यात करोना रुग्णावर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाकडील आकडेवारीनूसार जिल्ह्यात सध्या 23 हजारांच्या जवळपास सक्रिय रुग्ण असून यात 17 हजार 434 ग्रामीण भागातील असून उर्वरित 4 हजार 554 हे शहरी भागातील आहेत.

जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये 6 हजार 470 करोना रुग्ण असून यात 5 हजार 488 हे ग्रामीण भागातील आहे. जिल्हा आणि खासगी कोविड रुग्णालयात 577 रुग्णांवर उपचार सुरू असून यात 183 ग्रामीण भागात तर 394 शहरी भागातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. यासह 1 हजार 711 रुग्ण हे होमआयसोलेशनमध्ये असून त्यात अवघे 156 ग्रामीण भागात तर 1 हजार 555 हे शहरातील असल्याची आकडेवारी आरोग्य विभागाने दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com