संगमनेरच्या आरटीओ कार्यालयासाठी ना. थोरात यांची परिवहन मंत्री यांच्यासमवेत बैठक

संगमनेरच्या आरटीओ कार्यालयासाठी ना. थोरात यांची परिवहन मंत्री यांच्यासमवेत बैठक

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर (Sangamner) हे अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) मध्यवर्ती व मोठे ठिकाण आहे. तसेच संगमनेर (Sangamner) तालुक्यामध्ये वाहनांची संख्याही सर्वाधिक असून अकोले-राजूर (Akole Rajur) या परिसरातून व संगमनेर (Sangamner) तालुक्यातून आरटीओ कार्यालयाच्या (RTO Office) कामकाजासाठी श्रीरामपूर (Shrirampur) हे दूरवर पडते. म्हणून संगमनेर (Sangamner) याठिकाणी नव्याने आरटीओ कार्यालय (RTO office) सुरू करणेबाबत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी पुढाकार घेतला असून याबाबत लवकर प्रस्ताव सादर होणार आहे.

मुंबई मंत्रालय (Ministry of Mumbai) येथे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या कार्यालयात संगमनेरमध्ये (Sangamner) आरटीओ कार्यालय सुविधा (RTO office facility) उपलब्ध करून देण्याबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab), परिवहन आयुक्त अविनाश ढोकणे (Transport Commissioner Avinash Dhokne) आदी उपस्थित होते.

सध्या संगमनेरसाठी (Sangamner) श्रीरामपूर (Shrirampur) येथे आरटीओ कार्यालय (RTO Office) आहे. परंतु संगमनेर-अकोले (Sangamner-Akole) येथील नागरिकांना हे अंतर जास्त होत आहे. संगमनेरमध्ये (sangamner) वाहनांची संख्या सर्वाधिक आहे तर मोटार सायकल मध्ये संगमनेरचा (sangamner) राज्यात प्रथम क्रमांक लागतो आहे. संगमनेरमध्येच परिवहन कार्यालय निर्माण व्हावे यासाठी नामदार बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला असून नव्याने आरटीओ कार्यालय व वाहन तपासणी ट्रेकसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे नामदार थोरात यांनी सांगितले. यावर तातडीने प्रस्ताव सादर करून संगमनेर मध्ये लवकरच आरटीओ कार्यालय सुरू करणे बाबत परिवहन मंत्र्यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या आहे. तोपर्यंत दर आठवड्यात संगमनेर येथे विशेष शिबिर आयोजित करण्याचे आदेशही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत.

नामदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याने संगमनेरमध्ये अद्ययावत असे उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, नगर पालिका इमारत, नव्याने उभी राहिलेली अद्ययावत न्यायालय इमारत, पंचायत समिती इमारत, कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह, क्रीडासंकुल, बायपास यांसह महाराष्ट्रात सर्वात लक्षवेधी आकर्षण ठरणारे बस स्थानक यांचा समावेश आहे. आता नव्याने होणारे आरटीओ कार्यालय यामुळे संगमनेरच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. या निर्णयामुळे संगमनेर तालुक्यातील वाहनधारकांमध्ये मोठे उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com