पदोन्नतीतील आरक्षणासाठी रिपाइंचे आज श्रीरामपूरमध्ये आंदोलन

पदोन्नतीतील आरक्षणासाठी रिपाइंचे आज श्रीरामपूरमध्ये आंदोलन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मागासवर्गीय दलित कर्मचार्यांचे पदोन्नतीतील मिळणारे आरक्षण अचानक रद्द करण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करीत आहे. राज्य सरकारने तात्काळ पदोन्नतीत आरक्षण लागू करावे. या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशान्वये आज दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय श्रीरामपूर याठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने दि.01 जून ते 07 जून 2021 पर्यंत करोना प्रतीबंधक नियमांचे पालन करून संपूर्ण महाराष्ट्रात मागासवर्गीयांच्या पदोन्नतीत तात्त्काळ आरक्षण लागू करावे या मागणीसाठी आंदोलने करून या सोंग घेऊन झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष कर्मचार्‍यांच्या न्याय हक्कासाठी मैदानात उतरला आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारने तात्काळ पदोन्नतीत आरक्षण लागू करावे. या मागणीसाठी जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाइंचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत. आज श्रीरामपूर तहसील कचेरीवर दुपारी 12 वाजता निदर्शने होणार आहेत अशी माहिती सुनील शिरसाठ यांनी दिली आहे.

सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी युवक जिल्हाध्यक्ष महेंद्र साळवी, कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, रितेश एडके, मोहन आव्हाड. राजु मगर, संजय बोरगे, राजू गायकवाड, अ‍ॅन्थोनी शेळके. रमेश अमोलिक. मोजेस चक्रनारायण, आबा रणनवरे, रितेश पवार, बंडू सुतार, राहुल बारसे, सुनील रुपटक्के, सलीमभाई शेख, रवी दाभाडे, प्रदीप गायकवाड, अर्जुन करपे, अमोल बोधक, सुनिल हिवराळे, दीपक भिंगाने, अजय शिंदे, सनी माघाडे, पंकज साळवे आदीसह. युवक आघाडी. वाहतूक आघाडी, महिला आघाडी आदी प्रयत्नशील आहेत. सदर आंदोलन सोशल डिस्टन्सचे नियम पाळून करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com