आदिवासी मुलीवर अत्याचार तसेच खूनप्रकरणी नराधमास शासन व्हावे

आरपीआयच्यावतीने लोणी पोलीस स्टेशनला निवेदन
आदिवासी मुलीवर अत्याचार तसेच खूनप्रकरणी नराधमास शासन व्हावे

बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleswar

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा गावातील पहाटे झालेल्या भूत बंगला परिसरातील वस्तीत

आदिवासी मुलीवर अत्याचार करून बेशुद्ध अवस्थेत खून करणार्‍या नराधमास तसेच रावेर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन एकाच कुटुंबातील चार भावंडांचा खून झाला. या प्रकरणाचा तातडीने तपास लावून कठोर शासन व्हावे, या मागणीचे निवेदन आरपीआयच्यावतीने लोणी पोलीस स्टेशनला देण्यात आले.

या दोन्ही घटना खांदेशातील आहेत. तरी अशा नराधमांस जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे. जेणेकरून भविष्यात असे अत्याचार करण्याचे धाडस कोणीही करणार नाही. तरी सदर घटनांचे गांभीर्य लक्षात घेता अनुसूचित विरूद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर शासन व्हावे, अशा आशयाचे निवेदन आरपीआयच्यावतीने लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना देण्यात आले.

यावेळी आरपीआय महिला जिल्हा अध्यक्षा मंदाताई पारखे, भावेश ब्राम्हणे, अण्णा ब्राम्हणे, अमोल कुर्‍हाडे, दादा शिंदे, इरफान मनियार, दीपक शिरसाठ आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com