
नेवासा | वार्ताहर | Newasa
शनिवारी होणार्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलिसांनी शहरातील प्रमुख भागातून गुरूवारी सायंकाळी रूट मार्च काढला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिहं यांच्या मार्गदर्शनाखाली शेवंगाव उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पोलीस निरीक्षक भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात, व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
शहरातील प्रमुख भागामध्ये हा रूट मार्च काढण्यात आला. करोना संसर्ग आजारा वाढत असल्याने यंदाची बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करा, कोणीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये अशा सुचना यावेळी पोलिसांनी दिल्या. सदरील रूट मार्च मध्यें नेवासा, सोनई, शेवंगाव, शिंगणापूर, येथील साठ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.