बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचा 'रूट' मार्च

शहरातील तीन भागामध्ये रूट मार्च
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांचा 'रूट' मार्च

अहमदनगर । प्रतिनिधी । Ahmednagar

शनिवारी होणार्‍या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शहरातील प्रमुख भागातून गुरूवारी दुपारी रूट मार्च काढला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवालीचे निरीक्षक प्रवीण लोखंडे, तोफखान्याचे निरीक्षक हारूण मुलाणी, भिंगार पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह तिन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरसीपी, एसआरपी, क्यूआरटी पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.

शहरातील तीन भागामध्ये हा रूट मार्च काढण्यात आला. याची सुरूवात कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून झाली. आशोका हॉटेल, झेंडीगेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा चौक, जुना बाजार रोड, पंचपीर चावडी, फुलसौंदर चौक, माळीवाडा वेस असा पहिला रूट मार्च काढण्यात आला. दुसरा रूट मार्च चौपाटी कारंजा, चितळे रोड, तेली खुंट, बेलदार गल्ली, मच्छी मार्केट, कोंड्यामामा चौक, राजचंबर, कोठला असा होता. तर, भिंगार पोलीस ठाणे हद्दीतील मुकुंदनगर परिसरात तिसरा रूट मार्च काढण्यात आला. करोना संसर्ग आजारा वाढत असल्याने यंदाची बकरी ईद घरामध्येच साध्या पद्धतीने साजरी करा, कोणीही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, नमाज घरीच अदा करा अशा सुचना यावेळी पोलिसांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com