रेशनकार्डधारकांच्या माथी किडलेली मका

गहू ऐवजी प्रतिमाणसी दोन किलो मका
रेशनकार्डधारकांच्या माथी किडलेली मका

श्रीगोंदा | प्रतिनिधी

तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात मागील महिन्यापासून लाभार्थीना गहू देण्याऐवजी प्रति लाभार्थी दोन किलो मका दिली जात असून दिलेली मका ही खराब आणि किडकी आहे.

तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानात मका वाटप करण्यात येत असून किडलेली मका वाटप सुरू असल्याने लाभार्थी तक्रार करत आहेत. मात्र पुरवठा विभागाने आपले हात वर करत मागील महिन्यात चांगली मका दिली, मात्र या वेळी जामखेड वरून आलेली मका ही खराब असल्याचे पुरवठा निरीक्षक पाचरणे यांनी सांगितले आहे.

आता मका ही कुणी आहारात वापरत नाही. तरी ही मका लाभार्थ्यांच्या माथी मारली जात आहे. त्यात या महिन्यात लॉकडाऊन असल्याने कुणी राज्य सरकारने जाहिर केलेले प्रति लाभार्थी पाच किलोचे मोफत धान्य अजून वाटप सुरू झाले नाही. जे धान्य नियमित मिळते त्यात देखील निकृष्ट धान्य मिळत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com