मुळा डाव्या कालव्यातून रब्बीसाठी आवर्तन

मुळा धरणात सध्या 25 हजार 679 दशलक्ष घनफूट पाणी साठा
मुळा धरण
मुळा धरण

राहुरी | Rahuri

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनाप्रमाणे आज सकाळी अकरा वाजता मुळा धरणातून डाव्या कालव्याला 100 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

उजव्या कालव्यातून उद्या सकाळी पाणी सोडण्याची शक्यता आहे. एकूण 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरण सध्या 25 हजार 679 दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे. उजव्या कालव्या खाली 30 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तर डाव्या कालव्यात खाली 3200 हेक्टर ओलिताखाली येणार आहे. रब्बीच्या पहिल्या आवर्तनामुळे कांदा, गहू, ऊस चारा पिके व फळबाग यांना फायदा होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com