तीन महिन्यांत रोहयोतून 20 कोटींची कामे

1 हजार 482 कामांवर 7 हजार 382 मजुरांची उपस्थिती
तीन महिन्यांत रोहयोतून 20 कोटींची कामे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात (District) गेल्या तीन महिन्यांत करोनाचा प्रादुर्भाव असतांनाही ग्रामीण भागात (Rural Areas) तब्बल 20 कोटींचा खर्च रोजगार हमीच्या (Rojgar Hami) कामांवर झाला. यात 1 हजार 482 कामातून 7 हजार 38 हजार मजूरांच्या हाताला काम मिळाला.

मागील वर्षी करोनाच्या (Corona) पहिल्या लॉकडाऊनमध्ये (First Lockdown) मार्च महिन्यांत पुण्या-मुंबईसह (Pune-Mumbai) इतर मोठ्या शहरातील लोक गावाकडे स्थलांतरित (Migrants) झाले. त्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने ग्रामपंचायतीमार्फत (Grampanchayat) या लोकांना रोजगार हमी योजने (Rojgar Hami Yojana) अंतर्गत अनेक कामे उपलब्ध करून दिली. यामुळे गेल्या आर्थिक वर्षात नगर जिल्ह्यातील 1311 ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमीची विविध कामे सुरू होती. त्यानंतर 31 मार्चनंतर नवीन आर्थिक वर्षाच्या पहिला तीन महिन्यांत 20 कोटींची कामे झालेली आहे.

यात कृषी विभागाच्या (Department of Agriculture) 290 कामांवर 1 हजार 878 मजूर, सामाजिक वनीकरण विभागाच्या (Department of Social Forestry) 96 कामांवर 856, वन विभागाच्या 19 कामांवर 218 मजूर, रेशमी विभागाच्या 14 कामावर 88 मजूर आणि अन्य विभागाच्या 2 कामावर 76 मजूरांची उपस्थिती होती. यात एप्रिल आणि मे महिन्यांत जिल्ह्यात बर्‍यापैकी लॉकडान होते. तरी सुरू असणार्‍या कामांमध्ये घरकुले, शोषखड्डे तयार करणे, शौचालय बांधणे, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड फळबागांची लागवड (Planting of orchards), निगराणी अशा कामांचा समावेश होता.

तालुकानिहाय झालेला खर्च (लाखात)

अकोले 107.25, जामखेड 170.70, कर्जत 231.19 कोपरगाव 76, नगर 133.15, नेवासा 159. 37, पारनेर 149. 30, पाथर्डी 139.44 राहाता 85.22, राहुरी 49.60, संगमनेर 187. 85, शेवगाव 129.80, श्रीगोंदा 64.40, श्रीरामपूर 155.93 असे एकूण 1934. 45 असे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com