रोहयो : प्रत्येक गावात 5 कामे शेल्फवर ठेवण्याचे निर्देश

रोहयो : प्रत्येक गावात 5 कामे शेल्फवर ठेवण्याचे निर्देश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रोजगार हमी योजने (Employment Guarantee Scheme) अंतर्गत मजुरांनी कामाची मागणी (Demand) केल्यावर कामास मजुरांच्या मागणी (Demand) नंतर तांत्रिक व प्रशासकीय मान्यता (Technical and administrative approval) देण्यास येत असल्यामुळे मजुरांना कामे विहित वेळेत देण्यास विलंब होतो. त्यामुळे गरजू मजुरांना वेळीच कामे उपलब्ध करून देता येत नाही. या पार्श्वभूमीवर आता शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीतील (Grampanchayat) 5 कामे शेल्फवर ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee) योजने अंतर्गत राज्यात कामे मोठया प्रमाणावर सुरु असून रोजगार हमी योजना विभागाने भी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या तत्वाने वाटचाल सुरू केली आहे.

परिपत्रकान्वये शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीतील 5 कामे शेल्फवर (Shelf) ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत. शेल्फवर काम ठेवणे म्हणजे ज्या त्या वर्षाच्या लेबर बजेट मध्ये किमान 5 कामांची यादी ठेवणे असे समजले जाते. परंतु मजुरांनी कामाची मागणी केल्यावर कामास मजुरांच्या मागणी नंतर तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्यामुळे मजुरांना कामे विहित वेळेत देण्यास विलंब होतो. त्यामुळे गरजू मजुरांना वेळीच कामे उपलब्ध करून देता न आल्यामुळे मत्तानिर्मिती होत नाही व सदर मत्तानिर्मिती न झाल्यामुळे ग्रामीण भागांतील गरिबांचे जगणे सुखकर होण्यास अडथळा निर्माण होतो.त्यामुळे गरजू मजुरांना वेळेवर कामे उपलब्ध करून देता यावे याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रत्येक ग्रामपंचायत (Grampanchayat) आणि गावात किमान 5 कामे शेल्फवर (Shelf) ठेवण्याबाबत चे वेळापत्रक :-प्रत्येक ग्रामपंचायतीत तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसह कामे शेल्फवर उपलब्ध करून देण्याची शेवटची दि.30 सप्टेंबर, 2021 अशी असेल.

गट ग्रामपंचायत असेल तेथे किमान निम्म्या महसुली गावात तांत्रिक व प्रशासकीय मान्यता असलेली किमान 5 कामे उपलब्ध करण्याची शेवटची दि. 15 ऑक्टोबर, 2021 अशी असेल. राज्यातील सर्व महसूल गावात तांत्रिक व प्रशासकीय मान्यता असलेले प्रत्येकी किमान 5 कामे उपलब्ध करण्याची शेवटची दि.31 ऑक्टोबर, 2021 अशी असेल.

प्रत्येक ग्रामपंचायतीत /गावात वरील प्रमाणे कामे शेल्फवर असेल तर उपलब्ध कामातील किमान 40% कामे (5 पैकी किमान 2 कामे) सार्वजनिक स्वरूपाची असावीत. या वर्षापासून समृद्धी बजेट तयार करावयाचे असल्याने प्रत्येक गावात 50,100 किंवा 500 कामे शेल्फवर असणे अपेक्षित आहे . आणि प्रत्येक तालुक्यात जास्तीत जास्त कामे शेल्फवर ठेवणार्‍या पहिल्या तीनगावांना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील असे कळविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com