रोहकले प्रणित गुरूमाऊली मंडळाकडून शाखानिहाय आंदोलने

संचालकांनी राजीनामे देऊन पदावरून पायउतार व्हावे
रोहकले प्रणित गुरूमाऊली मंडळाकडून शाखानिहाय आंदोलने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रावसाहेब रोहकले (Ravsaheb Rohokale) प्रणित गुरूमाऊली मंडळाकडून (Gurumauli Mandal) आठ टक्के कर्जव्याजदर (Loan Intrest) आणि डिव्हिडंट मागणीसाठी (Demand) शनिवार जिल्ह्यातील सर्व शाखासमोर आंदोलने (Movement) करण्यात आली. यावेळी सभासदांच्या (Member) कर्जावरील व्याजदर (Loan Intrest) कमी करून 8 टक्के करावा, गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असणारा सभासदांचा लाभांश सभासदांच्या खात्यावर वर्ग करावा, बँक निवडणुकीमध्ये (Bank Election) अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघामधून एका प्रतिनिधी संचालक म्हणून निवड केली जाते. त्यामध्ये पोटनियम दुरुस्ती करून अनुसूचित जाती जमाती सभासदांना एक अतिरिक्त जागा संचालक म्हणून देण्यात यावी, अशी मागणी (demand) निवेदनाद्वारे करण्यात आली.

दरम्यान संचालकांची मुदत संपून एक वर्ष झाले असून सत्तेची उब संचालकांना सुटत नसून जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने औरंगाबाद खंडपीठामध्ये अ‍ॅड. गुलाबराव राजळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. यामुळे संचालक मंडळाने आता तरी जागे व्हावे, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बँकेच्या निवडणुकीचा ठराव करावा. संचालक मंडळाने राजीनामा दिल्यास बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल म्हणून सर्व संचालकांनी उद्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये राजीनामा सभासदांच्या पुढे द्यावा, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे आणि मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांनी जिल्ह्याच्यावतीने शिक्षक बँकेचे मुख्यालय येथे निवेदन देताना केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com