दरोड्याच्या तयारीत असलेले पुणे जिल्ह्यातील 5 दरोडेखोर जेरबंद

दरोड्याच्या तयारीत असलेले पुणे जिल्ह्यातील 5 दरोडेखोर जेरबंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नेवासा रस्त्यावर शिरसगाव शिवारात ओव्हरब्रीज जवळ अंधारात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारीत असलेल्या पुणे जिल्ह्यातील आरोपींना हत्यारासह व गाडीसह श्रीरामपूर शहर पोलिसांनी पकडले. पोलिसांच्या कामगिरीमुळे आरोपींचा गुन्हा करण्याचा डाव उधळला गेला. या दरोडेखोरांकडून पोलिसांनी 1 लाख 88 हजार 240 रुपांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या सुचनेप्रमाणे शहर पोलीस रात्री पेट्रोलिंग करत असताना 2.30 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर शिरसगाव शिवारात ओव्हर ब्रीजजवळ रोडच्या बाजूला अंधारात काही आरोपी गाडीसह संशयितरित्या दिसून आले. पोलिसांनी तातडीने मारुती ओमनी व्हॅन नं. एमएच 14 सीके 9288 पकडली. काही आरोपींना पकडले तर काही आरोपी अंधारात पळून गेले. पकडलेल्या आरोपींजवळून मोबाईल हॅण्डसेट रोख रक्कम धारदार चाकू, व्हेक्सा ब्लेड, नायलॉन दोरी, लोखंडी कटावणी असा 1 लाख 88 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. घटनास्थळी डिवायएसपी मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी भेट दिली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक साईनाथ राशिनकर यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 667/2021 प्रमाणे खलील महेबुब कुरेशी, (वय 45), रा. शनि मंदिरासमोर, शुक्रवार पेठ, जुन्नर, जि. पुणे, तुषार अरुण रोकडे, (वय 24), रा. भिमनगर, पाडळी नाका, नं. 1, जुन्नर, जि. पुणे, अरबाज कुतुबद्दीन शेख, (वय 21) रा. बारव, जुन्नर, जि. पुणे, तौफिक हबीब इनामदार, (वय 34) रा. आगरपेठ, जुन्नर जि. पुणे, मोबीन रशिद आत्तार, (वय 20) रा. नारायणगाव बसस्टॅण्डच्या मागे, ता. जुन्नर जि. पुणे, समीर शिंदे, रा. जुन्नर (पळून गेलेला) यांचेविरुद्ध भादंवि कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून 5 आरोपींनी अटक करण्यात आली आहे. पसार समीरचा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बोरसे हे शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com