भेंडा l वार्ताहर l Bhenda

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील श्रीसंत नागेबाबा मंदिर रस्त्यावरील पांडुरंग आरगडे यांच्या श्रीकृष्ण

प्रोव्हिजन या किराणा दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरांनी 70 हजारांचा किराणा लंपास केल्याची घटना रविवार दि. 7 रोजी मध्यरात्री 2 वाजता घडली.

श्री.आरगडे यांच्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर किराणा दुकान आहे तर दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या मोठा मुलगा अविनाश आरगडे व तिसऱ्या मजल्यावर शशिकांत मोरे हे भाडेकरू राहतात. रात्री कोणीतरी टेम्पोमध्ये माल टाकत असल्याचा आवाज आल्याने भाडेकरू श्री.मोरे यांनी आरगडे यांना फोन केला व आरडाओरड केली. तोपर्यंत चोरटे टेम्पोत भरलेला किराणा माल घेऊन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कुकाणा पोलीस घटनास्थळी हजर झाले. चोरट्यांनी दुकानातून गावरान तूप, काजू, बदाम, सिगारेट अशा महागड्या वस्तूसह 7 हजार 500 रुपयांची रोख रक्कम असा 70 हजारांचा किराणा घेऊन पसार झाले. याबद्दलची तक्रार श्री. आरगडे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.