नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे घरफोडी
सार्वमत

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे घरफोडी

सलाबतपूर गावाच्या भरवस्तीत मध्यरात्री एका घरात घरफोडी झाली आहे

Nilesh Jadhav

सलाबतपूर | वार्ताहर | Salabtpur

नेवासा तालुक्यातील सलाबपूर येथे शुक्रवारी मध्यरात्री भरवस्तीमध्ये घरफोडी होऊन 6 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 40 हजार रुपये रोख असा सुमारे 3 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.

याबाबत माहिती अशी, सलाबतपुर गावाच्या भरवस्तीत मध्यरात्री एका घरात घरफोडी झाली आहे. आज्ञात चोरट्यांनी ६ तोळे सोनं तसेच ४० हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेले. चोरट्यांनी घरात घुसुन कपाटाच्या वर ठेवलेल्या चावीने कपाटाचे कुलुप उघडुन आतील सोने तसेच रोख रक्कम चोरी केली आहे. तसेच इतर सामानाची उचकापाचक करून काही सामान घराच्या बाजुला आणुन टाकले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com