दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी राहुरीत जेरबंद

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी राहुरीत जेरबंद

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

गुप्त खबर्‍याने (Secret News) दिलेल्या माहितीवरून नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) शहर हद्दीत पाच दरोडेखोर दरोडा ( Robbery) टाकण्याच्या तयारीत असताना राहुरीच्या पोलीस (Rahuri Police) पथकाने छापा (Raid) टाकला. यावेळी दोघांना पाठलाग करून पकडले तर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

दि. 21 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान राहुरी पोलीस ठाण्यातील (Rahuri Police Station) पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव (Sub Inspector of Police Tushar Dhakrao), हवालदार महेंद्र गुंजाळ व चालक लक्ष्मण बोडखे आदी पोलिसांचे पथक कोम्बींग ऑपरेशन (Police Squad Combing Operation) करत होते. या दरम्यान गुप्त खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने राहुरी (Rahuri) शहरहद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर (Nagr-Manmad Highway) जुने बसस्थानक परिसरात रात्री साडेबारा वाजे दरम्यान छापा टाकला. त्यावेळी तेथे पाचजण एका घरावर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत होते.

पोलिसांना पाहताच ते पळू लागले. यावेळी पोलीस पथकाने दोघाजणांना पाठलाग करुन पकडले. तर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पकडण्यात आलेले दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांची नावे भारत भाऊसाहेब ढोकणे (वय 28 वर्षे, रा. जुने बसस्थानक, राहुरी) तसेच ओमकार सुनील डहाके (वय 21 वर्षे, रा. कोळीवाडा राहुरी) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्या ताब्यातून मिरची पूड (Chili Powder) व एक लोखंडी टामी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बाकी पसार असलेल्या तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस चालक लक्ष्मण बोडखे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भारत भाऊसाहेब ढोकणे, ओमकार सुनील डहाके व इतर तिघेजण असे एकूण पाचजणांवर दरोड्याचा गुन्हा (Crime of Robbery) दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत (Assistant Inspector of Police Shankarsingh Rajput) हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com