दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन सराईत अटकेत

कोतवाली पोलिसांची कामगिरी || दोघांना केली होती लुटमार
दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन सराईत अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्यावसायिकासह दोघांना लुटमार (Robbery) करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) ताब्यात घेत अटक (Arrested) केली आहे. अविनाश विश्वास जायभाय (रा. दुधसागर सोसायटी, केडगाव), अजित रामदास केकाण (रा. सारसनगर) अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर हाणामारी व चोरीचे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.

दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन सराईत अटकेत
नगर तहसील समोर उपोषण करणाऱ्यांपैकी एकाची प्रकृती खालावली

30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी नगर शहरातील कर्पे वीट भट्टीजवळुन अफताब नवाब बागवान (रा. हातमपुरा) हे त्यांच्या नातेवाईकासह टेम्पो (Tempo) घेऊन जात असताना जायभाय व इतरांनी त्यांच्या वाहनास थांबवून पाण्याचे बाटलीची मागणी केली. पाणी दिले नाही म्हणून लोखंडी फायटर, लोखंडी रॉड, लाकडी दांड्याने मारहान करून जिवे मारण्याची धमकी (Threat) दिली. तसेच टेम्पोत ठेवलेले दोन लाख 25 हजार, मोबाईल, महत्वाचे कागदपत्रे काढून घेतली होती. याप्रकरणी बागवान यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दरोड्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन सराईत अटकेत
मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा - आ. गडाख

सदरचा गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक आश्विनी मोरे या करीत असून त्यांनी अविनाश जायभाय व अजित केकाण यांच्या शोध घेऊन त्यांना अटक (Arrested) केली आहे. निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोरे, अंमलदार प्रमोद लहारे, रवींद्र टकले, तानाजी पवार, सत्यजीत शिंदे, दीपक रोहोकले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन सराईत अटकेत
कांद्याचा तुटवडा; दोन महिने दर तेजीत राहणार
दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन सराईत अटकेत
जखणगावात जातगणना सुरू
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com